सिडकोकडून नवीन वर्षाची लॉटरी जाहीर..! घर, व्यावसायिक शॉप, प्लॉट घेण्याची सुवर्ण संधी Cidco Lottery 2023

Cidco Lottery 2023 : नवीन वर्षात, सिडको कॉर्पोरेशनने गुंतवणूकदार आणि घर खरेदीदारांसाठी नवी मुंबईच्या विविध उपनगरांमध्ये भूखंड विक्रीची घोषणा केली आहे. इच्छुक गुंतवणूकदारांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. या योजनेत गुंतवणूकदार लिलावाद्वारे फ्लॅट, बंगले आणि व्यावसायिक भूखंड खरेदी करू शकतात.

हे भूखंड घणसोली, वाशी,नेरुळ, खारघर, सानपाडा, नवीन पनवेल आणि कळंबोली येथे असून या योजनेंतर्गत कमाल सात हजारांपासून ते किमान दीडशे चौरस मीटरपर्यंतचे विविध भूखंड मिळू शकतात. सिडकोने आता सर्व सामान्यांसाठी नवीन चार हजार घरांची योजना आणली आहे.

घरांचे रजिस्ट्रेशन कण्यासाठी येथे क्लीक करा

ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असून गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना या घरांचा लाभ मिळू शकणार आहे. खारघर,कळंबोली, तळोजा, आणि द्रोणागिरी नोडमध्ये ही घरे आहेत. विशेष म्हणजे ही सर्व घरे पूर्वीच्या निवासी योजनांचे शिल्लक आहेत. ग्राहक अनेक दिवसांपासून सिडकोच्या नवीन गृहनिर्माण योजनेची वाट पाहत होते. परंतु विविध कारणांमुळे सोडतीला उशीर झाला.

सिडकोच्या घरांचे रजिस्ट्रेशन कण्यासाठी येथे क्लीक करा

दिवाळीत किमान घरकुल योजना जाहीर होईल, असे सर्व ग्राहकांना वाटत होते. मात्र ही आता मुदत संपल्याने ग्राहकांच्या पदरी निराशाच पडली. मात्र, सिडकोने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी उर्वरित ४ हजार घरांची विक्री करण्याचे नियोजन केले आहे. त्याचवेळी भूखंड विक्री योजनाही जाहीर करण्यात येणार आहे. याचे नवी मुंबईतील विविध भागात 64 छोटे-मोठे भूखंड आहेत. हे भूखंड व्यावसायिक आणि निवासी वापरासाठी आहेत.

हेही वाचा : विरारमधील म्हाडाचे बोळींज येथील घरे ठरणार फायदेशीर,पहा कधीपर्यंत आहे अर्जस्वीकृती..! Mhada Flat

Leave a Comment