मुंबईत पुन्हा एकदा स्वस्तात घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी, जाणून घ्या कुठे असणार ही घरे?

मुंबई महानगर प्रदेशात परवडणारी घरे विकसित करण्यासाठी सनटेक रियल्टी आणि IFC यांनी 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी एक संयुक्त मंच तयार केला आहे. IFC ही उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये खाजगी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी सर्वात मोठी जागतिक विकास संस्था आहे. सनटेक रियल्टीने गुरुवारी शेअर बाजाराला माहिती दिली की त्यांनी IFC सोबत भागीदारी करून एकूण 750 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक संयुक्त मंच तयार केला आहे.

गुंतवणुकी दरम्यान, एमएमआरमधील ४ ते ६ ग्रीन हाऊसिंग प्रकल्पांमध्ये जवळ जवळ १२,००० घरे ही बांधली जाणार आहेत. IFC साधारण ३३० कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करणार आहे, तर उर्वरित गुंतवणूक Sunteck Realty द्वारे केली जाईल.

Sunteck Realty चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कमल खेतान म्हणाले की, “मुंबई मधील घरांची कमतरता ही दूर करण्याच्या आमच्या समान उद्दिष्टामध्ये IFC सोबत सहकार्य करताना आम्हाला अधिक आनंद होत आहे.आणि यामुळेच आता मुंबईत मोठ्या प्रमाणात सर्व सामान्यांना परवडणारी घरे ही उपलब्ध होतील.आणी त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर मिळू शकणार आहे.

ही घरे मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे असल्याचे सांगण्यात येत आहे. या घरांच्या किमती डेव्हलपर्स ऑफर करत असलेल्या किंमतीपेक्षा खूपच कमी असणार आहेत. यात 1 BHK आणि 2 BHK घरे असतील. या घरांच्या विक्रीसाठी लवकरच ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या घरांची विक्री सुरू झाल्यास, आम्ही तुम्हाला आमच्या ग्रुपद्वारे सर्वत्र माहिती अपडेट करण्याचा प्रयत्न करू.

हेही वाचा :

Leave a Comment