पुणेकरांसाठी खुशखबर..! पुण्यात ई-लिलावाद्वारे स्वस्तात घरे, दुकान घेण्याची संधी, आत्ताच करा अर्ज

Pune : वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता महापालिकेने जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचा लिलाव 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार 2 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. यामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या निवासी मालमत्ता, नामांकित बांधकाम व्यावसायिक याची घरे व दुकाने, सराफा व्यापारी यांचा मालमत्तांचा समावेश आहे.

बांधकाम परवानग्यांमधून मिळणाऱ्या उत्पनातून महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे कर संकलन विभाग हा महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. गेल्या पाच वर्षांपासून कर वाढवला गेला नाही त्यामुळे करवसुलीवर भर दिला गेला. नोंदणी नसलेल्या मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्यांना कराच्या कक्षेत आणण्यात आले. परिणामी उत्पन्न वाढले. आता जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी ज्या मालमत्ताधारकांची महापालिकेचा कर वर्षानुवर्षे थकित होता, अशा मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने मालमत्ता जप्त करण्यात आल्या. आता त्यांचा सरकारी लिलाव होणार आहे. या मालमत्तांवरील कराची थकबाकी 50 हजार ते 3 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांची बाजारातील किंमत किमान 19 लाख ते 1.5 कोटी रुपये आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या अनुसूची ‘ड’ मधील प्रकरण VIII (कर आकारणी) नियम 42 ते 47 मधील तरतुदीनुसार, महानगरपालिकेने मालमत्तांची सार्वजनिक लिलावाद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

बोलीत सहभागी होण्यासाठी येथे क्लीक करून भरा फॉर्म

लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत कर संकलन विभाग, महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात आधार कार्ड, पॅन कार्डच्या प्रतींसह लेखी अर्जाद्वारे नोंदणी करावी लागेल. लिलाव झालेल्या मालमत्तेबाबत कोणतीही व्यक्ती, संस्था आणि इतरांचे आर्थिक हितसंबंध असल्यास आक्षेप, योग्य कागदपत्रांसह 3 ऑगस्टपूर्वी लेखी स्वरूपात नोंदवावेत. 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत कर आकारणी व कर संकलन विभागाच्या कार्यालयात लिलाव प्रक्रिया होणार असल्याचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

वाचा : डिपॉझिट तयार ठेवा..! म्हाडा लॉटरीत मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घरे, पहा फ्लॅटच्या किमती

2 thoughts on “पुणेकरांसाठी खुशखबर..! पुण्यात ई-लिलावाद्वारे स्वस्तात घरे, दुकान घेण्याची संधी, आत्ताच करा अर्ज”

Leave a Comment