नवी मुंबई : मुंबईसारख्या मोठ्या शहरात स्वतःचे घर घेणे ही काही सोपी गोष्ट नाही. सध्याच्या काळात घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना आणि लाखो रुपयांची घरे महागली असताना सिडको, म्हाडासारख्या संस्था सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशेचा किरण आहेत. त्यामुळेच जेव्हा सिडको आणि म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सुरू होतात तेव्हा घर मिळण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होते. आता मुंबईतील घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सिडकोची लॉटरी आता काढण्यात येणार आहे. 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सोडत काढण्यात येणार आहे.
सिडकोने प्रजासत्ताक दिनी घरांची योजना जाहीर केली होती. ही योजना तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील घरांसाठी होती. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल होती. त्यानंतर 19 एप्रिल रोजी संगणकीकृत सोडत काढण्यात येणार होती, मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 7 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली. मात्र त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली मात्र अखेर लॉटरी काढण्याची वेळ आली असून विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर म्हणजेच 16 जुलैनंतर 12 जुलै रोजी सकाळी 11 वाजता लॉटरी काढण्यात येणार आहे.
सिडकोने सांगितले की, सोडतीनंतर विजेत्या अर्जदारांची यादीही त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता जाहीर केली जाईल आणि अयशस्वी अर्जदारांना 29 जुलै रोजी त्यांच्या ठेवी परत केल्या जातील. या बातमीमुळे सिडकोकडे अर्ज केलेल्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.
मुंबई आणि परिसरात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र, सिडको ही घरे परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देते. सिडकोने तळोजा आणि द्रोणागिरीतील 3322 घरांसाठी लॉटरी काढली. यापैकी 61 घरे द्रोणागिरी नोडमध्ये असून 251 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तळोजा येथे आहेत. तर द्रोणागिरीमध्ये 374 घरे आणि तळोजा येथे 2636 घरे सर्वसामान्यांसाठी आहेत.
वाचा : पुणेकरांसाठी खुशखबर..! पुण्यात ई-लिलावाद्वारे स्वस्तात घरे, दुकान घेण्याची संधी, आत्ताच करा अर्ज