डिपॉझिट तयार ठेवा..! म्हाडा लॉटरीत मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घरे, पहा फ्लॅटच्या किमती

मुंबई २ बीएचके फ्लॅट : अभ्यास, शिक्षण व नोकरी आणि नंतर स्वतःचे घर… हे अनेकांचे स्वप्न असते. या स्वप्नासाठी काही मंडळींची धडपड आधीपासूनच सुरू होतात आणि मग हे प्रयत्न एका टप्प्यावर पोहोचतात आणि प्रत्यक्षात आकार घेतात. मात्र काहींना हक्काचे घर मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. येथे सर्वात मोठी समस्या पैशाची आहे. अनेक वेळा आवडलंय पण, खिशाला परवडत नाहीय, असे सांगून स्वप्नातल्या घरावर पाणी सोडलं जातं. मात्र, आता अशी परिस्थिती उद्भवणार नाही. कारण, म्हाडाच्या आगामी सोडतीत अनेकजण आपल्या स्वप्नातील घराच्या उभारणीसाठी हातभार लावताना दिसणार आहेत.

विधानसभा निवडणुका सुरू होण्यापूर्वी आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी निघणार असून, त्यासाठीचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया नजीकच्या काळात सुरू होणार आहे. येत्या महिनाभरात सोडतीची जाहिरात देऊन ऑगस्ट महिन्यापर्यंत अर्ज स्वीकारून विक्री करण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

→मोबाईलवर म्हाडाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा←

म्हाडाच्या या सोडतीअंतर्गत मुंबई लॉटरीत उपलब्ध असलेल्या उर्वरित घरांसह मालाड, गोरेगाव, दिंडोशी, पवई कोपरी, विक्रोळी कन्नमवार नगर येथेही घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाडाने 2020 ते 2022 दरम्यान सोडत काढली नसून, 2023 मध्ये 4082 घरांसाठीची सोडत काढली. पण, यंदा जुलैअखेर सोडत जाहीर होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

पहा लोकेशनसह घरांच्या किमती

ठिकाण । उत्पन्न गटघरांचं क्षेत्रफळघरांच्या किमती
कन्नमवारनगर विक्रोळी । मध्यम गट । 650 चौरस फूट । 70 ते 72 लाख
कन्नमवारनगर विक्रोळी । अल्प गट । 473 चौरस फूट । 40 लाख रुपये
कन्नमवारनगर विक्रोळी  । अल्प गट । 585 चौरस फूट । 50 लाख रुपये
पवई कोपरी । मध्यम गट । 700 ते 800 चौरस फूट । 1 कोटी 25 लाख
पवई कोपरी । उच्च गट । 980 चौरस फूट । 1 कोटी 60 लाख रुपये
खडकपाडा । अल्प गट । 44.61 चौ. मीटर । 64 लाख 72 हजार 584 रुपये
खडकपाडा । अल्प गट । 59.91 चौ. मीटर । 86 लाख 11 हजार 923 रुपये
गोरेगाव पहाडी । मध्यम गट । 794.31 चौरस फूट । 1 कोटी 7 लाख 5 हजार रुपये
गोरेगाव पहाडी । उच्च गट । 959 चौरस फूट । 1 कोटी 25 लाख 91 हजार रुपये
गोरेगाव पीएमवाय । 322 चौरस फूट । 33 लाख 2000 रुपये
मालाड शिवधाम । अल्प । 44.20 चौरस मीटर । 54 लाख 91 हजार रुपये
मालाड शिवधाम । अल्प 58.93 चौरस मीटर । 73 लाख 22 हजार रुपये

वाचा : स्वस्तात घर घेण्यासाठी भरा म्हाडाचा अर्ज, कसा तो आम्ही तुम्हाला सांगतो