मुंबई : म्हाडाचे घर आणि म्हाडाची सोडत बोललं की अनेकांचे कान टवकारतात. कारण, मालमत्तेच्या किमती झपाट्याने वाढत असलेल्या या शहरात गेल्या काही दिवसांपासून स्वप्नातील घर खरेदी करणे जवळपास अशक्य होत चालले आहे. वास्तविक या परिस्थितीत सर्वसामान्यांच्या मदतीला एक नाव पुढे येते ते म्हणजे म्हाडा.
आतापर्यंत अनेक सोडतीद्वारे म्हाडाची घरे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय 2024 मधील आगामी लॉटरी देखील होणार असून या लॉटरीमुळे हजारो इच्छुकांना आपले घर घेण्याचे त्यांचे स्वप्न साकार करता येणार आहे. म्हाडाच्या लॉटरीची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच या सोडतीतील काही घरांच्या किमती अचानक वाढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, काहींसाठी ही किंमत अशक्य आहे!
म्हाडाचे काही घरे एक कोटींना?
उपलब्ध माहितीनुसार, म्हाडा मुंबईतील गोरेगाव येथील प्रेमनगर भागात 332 उच्चभ्रू घरांचा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. या घरांच्या किमतींबाबत सुरुवातीपासूनच उत्सुकता होती. त्यानंतर आता त्यांची किंमत अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली असून अनेक प्रकारच्या चर्चा आणि कुतूहलाचे प्रश्न पाहायला मिळत आहेत.
म्हाडाच्या सोडतीमध्ये 794 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या मध्यम उत्पन्नाच्या घरासाठी 1 कोटी 10 लाख रुपये, तर उच्च उत्पन्न गटासाठी 979 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घरासाठी 1 कोटी 40 लाख रुपये घराची किंमत ठेवण्यात आली आहे.
कशी आहे इमारत?
गोरेगाव येथील प्रेमनगर भागात म्हाडाकडून सध्या या फ्लॅटचा समावेश असलेल्या 39 मजली गगनचुंबी इमारतीचे बांधकाम सुरू असून वर्षअखेरीस हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. म्हाडाची आगामी लॉटरी जुलैअखेर जाहीर होणार असून, या कोटींच्या घरांचाही त्यात समावेश होणार आहे. शहरातील महत्त्वाच्या भागात बांधल्या जाणाऱ्या या भागातील घरांना इच्छुकांकडून काय प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पहा एक कोटींचा सॅम्पल फ्लॅट
कोणकोणत्या सुविधा मिळणार?
कोटय़वधींच्या या इमारतींमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, पोडियम पार्किंग आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हाडाच्या या ‘ड्रीम मॉडेल’ला किती प्रतिसाद मिळतो, याकडेही रिअल इस्टेट क्षेत्राचे लक्ष राहणार आहे.
वाचा : पुण्यात घर घ्यायचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार..! म्हाडानी केली प्रारूप यादी जाहीर
3 thoughts on “म्हाडा लॉटरीत मुंबईत घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती पहा”