कोणत्याही शुभ कार्यात फक्त आंब्याच्या झाडाचीच पानं का वापरतात? पौराणिक उत्तर जाणून घ्या…Vastu Tips

Vastu Tips : आंबा हा फळांचा राजा मानला जातो. हिंदू धर्मात शुभ प्रसंगी आंब्याच्या पानांना खूप महत्त्व दिले जाते. आंब्याची पाने कोणत्याही धार्मिक कार्यात वापरली जातात. घराच्या दारावर आंब्याची पाने सजावटीसाठी लावली जातात. पूजेच्या वेळी आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. आंब्याच्या पानांच्या डहाळ्यांशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. शुभकार्यात घरामध्ये तोरण उभारताना आंब्याची पाने किंवा डहाळे ठेवण्याची परंपरा आपल्याकडे आहे. आंब्याची पाने फक्त दारावरच ठेवली जात नाहीत तर पूजेच्या वेळी कलशाच्या काठावरही पाने ठेवली जातात. पण शुभ पूजेत आंब्याची पाने का वापरली जातात? या मागचे कारण माहित आहे का…? चला तर मग आज जाणून घेऊया…

पूजेमध्ये आंब्याची पाने महत्त्वाची का असतात?

सनातन धर्म ग्रंथा नुसार आंब्याचे झाड हे मेष राशीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की राशी मेष असल्यामुळे आंब्याचे झाड सर्वात शुभ असते. असे मानले जाते की ज्या घराजवळ आंब्याचे झाड लावले जाते त्या घरावर देवी-देवतांची कृपा असते. यामुळेच घर, दुकान किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यात आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. घराच्या, दुकानाच्या दारावर हार घालणे असो किंवा पूजेत वापरणे असो, आंब्याची पाने हमखास मिळतात. तसेच धार्मिक मान्यतेनुसार आंबा हे भगवान हनुमानाचे आवडते फळ आहे. त्यामुळे जिथे आंबे आणि आंब्याची पाने असतील तिथे हनुमानाचा आशीर्वाद असतो, असाही समज आहे.

हेही वाचा : गृहकर्ज घेताय? थांबा, बिल्डरने बँकेतून उपलब्ध करून दिलेल्या गृह कर्जाचे फायदे व तोटे; पहा महत्वाची बातमी I Home Loan

याशिवाय घरातील हवन-यज्ञात आंब्याचे लाकूड नेहमी वापरले जाते. हवनात या लाकडाचा वापर केल्याने वातावरणात सकारात्मकता वाढते. असंही म्हटलं जातं की जेव्हा बाहेरची हवा पानांना स्पर्श करते तेव्हा सकारात्मकता घरात प्रवेश करते. एवढेच नाही तर आंब्याच्या पानांचे अनेक औषधी उपयोग आहेत.

सनातन धर्मात सर्व प्रमुख सण आणि शुभ प्रसंगी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचा तोरण लावण्याची परंपरा आहे. सनातन धर्मात असे म्हटले जाते की असे केल्याने घरामध्ये नकारात्मक शक्ती घरात प्रवेश देखील करत नाहीत आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा अधिक प्रवाह वाढतो.

(येथे दिलेली माहिती ही गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

हेही वाचा : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुण्यात फक्त 8 लाखात घर खरेदी करायची सुवर्णसंधी! म्हाडाच्या घरांसाठी वाढली मुदत वाढ; 2 Bhk Flat in Pune

Leave a Comment