Vastu Tips : वास्तुशास्त्रात देवघराला खूप महत्त्व आहे. प्रत्येकाच्या घरी प्रार्थनास्थळ असते ज्याला आपण देवघर म्हणतो. रोज सकाळ संध्याकाळ भगवंताची पूजा करताना त्यांच्यासमोर दिवा लावला जातो. दिवा हे प्रतिभेचे प्रतीक मानले जाते. दिवा लावल्याने घरात पवित्रता, चैतन्य आणि सकारात्मकता येते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे प्रतीक मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का वास्तुशास्त्रानुसार देवघरात कोणत्या दिशेला दिवा ठेवावा, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी सोबतच धनसंपत्तीही येईल, चला जाणून घेऊया शास्त्रामध्ये काय सांगितले आहे…
वास्तुशास्त्रानुसार दिवा लावण्याची पद्धत काय?
असे म्हणतात की दिवा लावल्याने नकारात्मक गोष्टी घरातून निघून जातात. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या समोर तूप आणि तेल हे दोन्ही दिवे लावले जातात. तुपाचा दिवा नेहमी डाव्या हाताने आणि तेलाचा दिवा नेहमी उजव्या हाताने लावावा असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. तुपाच्या दिव्यासाठी नेहमी पांढरा कापसाचा वापरावा, तर तेलाच्या दिव्यासाठी लाल दोरी किंवा रक्षाधाग्याचा वापर करावा, असेही सांगितले जाते.
वास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला लावावा दिवा?
वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावल्याने घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जाही निघून जाते. शास्त्रानुसार देवीला दिव्याचा प्रकाश विशेष आवडतो. त्यामुळे पूजेच्या वेळी दिवा लावणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम दिशेला दिवा लावणे सर्वात शुभ मानले जाते. पश्चिम दिशेला दिवा लावल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते असे मानले जाते.
यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि आनंद आणि समृद्धी मिळते. असे मानले जाते की दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य पूर्ण होत नाही. घर किंवा मंदिरात कोणत्याही धार्मिक कार्यक्रमापूर्वी देवतांच्या समोर दिवा लावला जातो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)
हेही वाचा : कोणत्याही शुभ कार्यात फक्त आंब्याच्या झाडाचीच पानं का वापरतात? पौराणिक उत्तर जाणून घ्या…Vastu Tips