मुंबईत या ठिकाणी बॉलिवूड स्टार्सनी खरेदी केली 400 कोटींची मालमत्ता

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून मुंबईत गृहखरेदी आणि कार्यालय खरेदीने उच्चांक गाठला असून, यामध्ये बॉलिवूड कलाकारांनीही 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. या खरेदीमध्ये बॉलिवूड कलाकारांनी वांद्रे। (पश्चिम), खार, ओशिवरा, जुहू, वर्सोवा, आदी ठिकाणांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे.

अलिबागलाही पुन्हा प्राधान्य रणबीर कपूरची आई नीतू कपूरने मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे 17 कोटी रुपयांना एका फ्लॅटची खरेदी केल्याची माहिती आहे. मुंबईप्रमाणेच वीकएंडसाठी अलिबाग येथेदेखील मालमत्ता खरेदीसाठी सिनेस्टार पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, अलीकडेच अभिनेत्री अनुष्का शर्मा व तिचा पती क्रिकेटपटू विराट कोहली यांनी 10 कोटी रुपयांना एक मालमत्ता खरेदी केल्याची माहिती आहे.

चालू वर्षात अभिनेता जॉन अब्राहम याने खार येथे 70 कोटी रुपयांना खरेदी केलेला बंगला आजही चर्चेत आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने वांद्रे रेक्लमेशन येथील एका आलिशान इमारतीमध्ये 2,430 चौरस फुटांचा फ्लॅट ११ कोटी रुपयांना खरेदी केलाचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, मार्च 2020 मध्ये याच इमारतीमध्ये तिने 4632 चौरस फुटांचा एक फ्लॅट 14 कोटी रुपयांना खरेदी केला होता.

अभिनेत्री दीपिका पदुकोण व तिचा पती व अभिनेता रणवीर सिंह यांनी सुपरस्टार शाहरूख खान याच्या प्रसिद्ध मन्नत बंगल्याशेजारीच असलेल्या एका आलिशान इमारतीमधील 16, 17, 18, 19 या मजल्यांची खरेदी करत 11 हजार 266 चौरस फुटांचे घर साकारल्याची माहिती आहे.

आलिया भट व रणबीर कपूर हेदेखील आपल्या नव्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. शोमन राज कपूर यांच्या पाली हिल येथील नर्गीस दत्त रोडवरील ‘कृष्ण-कुंज’ या बंगल्याच्या जागी आलिशान इमारत साकारली जात असून त्यामध्येच हे दोघे लवकरच राहायला जाणार आहेत.

वांद्रे, खार, ओशिवरा, जुहू, वर्सोव्याला जास्त पसंती

अमिताभ यांचे पुत्र व अभिनेता अभिषेक बच्चन यांनीदेखील मे महिन्यामध्ये बोरीवली येथे 6 फ्लॅटची खरेदी 15 कोटी 42 लाख रुपयांना केली आहे.

ओशिवरा येथील सिग्नेचर इमारतीमध्ये अभिनेता अजय देवगण, काजोल, कार्तिक आर्यन या आणि अशा अनेक कलाकारांनी कार्यालयांची खरेदी केली आहे.

गेल्या दीड वर्षात मालमत्ता • खरेदीमध्येही अमिताभ बच्चन हेच शहेनशहा ठरले आहे. या कालावधीमध्ये त्यांनी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.

ओशिवरा येथील सिग्नेचर इमारतीमध्ये अमिताभ यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात चार कार्यालयांची खरेदी 29 कोटी रुपयांना केली होती. त्या कार्यालयांचे एकत्रित आकारमान 8396 चौरस फूट इतके आहे; तर त्याच इमारतीमध्ये आता बच्चन यांनी आणखी तीन कार्यालयांची खरेदी केली आहे.

कार्यालयांचे आकारमान 8429 चौरस फूट इतके आहे. गेल्या एप्रिलमध्ये अमिताभ यांनी अलिबाग येथे 10 हजार चौरस फूट आकारमानाच्या भूखंडाची खरेदी 10 कोटी रुपयांना केली होती. तर, अयोध्येमध्येदेखील त्यांनी भूखंडाची खरेदी केली आहे.

Leave a Comment