आता 40 लाखांच्या आत घर खरेदी करणे आणखी कठीण होणार ; कारण ऐकून बसणार धक्का..!

लाखो मध्यमवर्गीय कुटुंबे दीर्घकाळापासून आपले स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पाहत असतात.मात्र स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न त्याला पूर्ण करता येत नाही कारण ते त्याच्या बजेटमध्ये मिळत नाही. अनेक सामान्य कुटुंबांना नेहमी वाटतं की कुठलीतरी सरकारी योजना किंवा कुणीतरी खाजगी विकासक परवडणाऱ्या घरांची योजना सुरू करेल आणि आपलं स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होईल. मात्र या योजनांच्या बजेटमध्येही घर देखील उपलब्ध नसते.

घर खरेदी करणाऱ्यांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. सध्याच्या काळात, बांधकाम व्यावसायिकांनी ४० लाख किंवा त्यापेक्षा ही कमी किमतीच्या घरांचा पुरवठा आता कमी करण्यास सुरुवात केलेली आहे. प्रॉपर्टी कन्सल्टन्सी फर्म अॅनारॉकच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.

बजेट मध्ये घरे बांधण्याचे प्रमाण कमी

माहितीनुसार, अलीकडच्या काळामध्ये बिल्डर स्वस्त सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधत नाहीत. काही बांधकाम व्यावसायिक हे बांधकाम करत असले तरी देखील त्यांचा वाटा अत्यल्प आहे. त्यामुळेच स्वस्त परवडणाऱ्या घरांची मागणी हि पूर्ण करणे शक्य नाही.

आकडेवारीनुसार परवडणारी घरे फक्त १८ टक्क्यांवर

आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमध्ये स्वस्त किंवा परवडणाऱ्या नवीन घरांचा पुरवठा केवळ 18 टक्क्यांवर घसरला आहे. जुलै-सप्टेंबर २०१८ मध्ये लॉन्च झालेल्या एकूण नवीन घरांमध्ये परवडणाऱ्या घरांचा वाटा ४२ टक्के होता. पण आता जुलै-सप्टेंबर २०२३ मध्ये स्वस्त आणि परवडणाऱ्या घरांचा वाटा १८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. अलीकडच्या काळात बिल्डर स्वस्त आणि परवडणारी घरे बांधत नसल्याचे यावरून दिसून येते.

Anarock services च्या मिळालेल्या अहवालात दिल्ली-NCR, मुंबई महानगर,चेन्नई, कोलकाता, प्रदेश, बेंगळुरू तसेच हैदराबाद आणि पुणे या मोठ्या सात शहरांमधील डेटाचा समावेश आहे. सध्या बिल्डर अधिक नफा मिळवण्यासाठी आलिशान महागडी निवासी प्रकल्पांकडे भर देतांना दिसून येत आहेत. तर स्वस्त छोट्या घरांमध्ये बिल्डरांना कमी नफा मिळत असतो. सध्या दिवसेन दिवस जमिनीच्या वाढत्या किमतीमुळे आता परवडणारे गृहनिर्माण प्रकल्प बांधकाम व्यावसायिकांसाठी आर्थिकदृष्ट्या बघताच परवडणारे नाहीत. अॅनारॉकच्या मते, आता एकूणच नवीन पुरवठ्यामध्ये परवडणाऱ्या घरांचा वाटा घसरत असताना, १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या लक्झरी घरांचा वाटा आता वेगाने वाढतच चालला आहे. गेल्या पाच वर्षांत त्यात तिप्पट वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटानंतर लोकांनी आता मोठ्या घरांची मागणी केली आहे.

हेही वाचा : यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर ठाण्यात घ्या अकरा लाखात घर I Mhada Mumbai

Leave a Comment