cidco lottery : सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत नैना परिसरातील सात विकासकांनी दिलेल्या १७१ घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी २१ सप्टेंबरपासून सुरू होईल. ही प्रक्रिया सिडकोकडून पूर्ण केली जाणार आहे.
उपलब्ध १७१ घरांपैकी ७ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि १६४ अल्प उत्पन्न गटांसाठी आहेत. या घरांसाठी (2 bhk flat in navi mumbai) २१ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. ८ नोव्हेंबर रोजी संगणकीकृत सोडत काढण्यात येणार आहे.
नैना प्रकल्प 4000 चौ.मी.च्या मंजूर DCPR नुसार पात्र उमेदवारांची निवड. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटांसाठी समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत मोठ्या क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांमध्ये घरे विकसित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार सात विकासकांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतल्यानंतर सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत उपलब्ध सदनिकांची माहिती दिल्यानंतर सिडकोने ही योजना जाहीर केली. विशेष बाब म्हणजे सिडको सोडतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करणार आहे.
या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले जाईल आणि अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी देखील केली जाईल आणि सोडतीसाठी पात्रता ही निश्चित केली जाणार. इच्छुक अर्जदार lottery.cidcoindia.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या गृहनिर्माण योजनेत सहभागी होऊ शकतात.
सर्वसमावेशक योजनेंतर्गत अधिग्रहित करण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी पात्र उमेदवारांची लॉटरीद्वारे निवड करणे आणि संबंधित विकासकाला यादी पाठवणे ही सिडकोची एकमात्र जबाबदारी आहे. त्यानंतरच्या सर्व कार्यवाही समजा- फ्लॅटची संपूर्ण रक्कम भरणे, गृहकर्ज घेण्यासाठी यशस्वी उमेदवाराला ना हरकत प्रमाणपत्र देणे, अर्जदारासोबत फ्लॅट करारावर स्वाक्षरी करणे, दुय्यम निबंधक कार्यालयात करारनाम्याची नोंदणी
सहकारी गृहनिर्माण संस्थांची स्थापना,किंवा अर्जकरणाऱ्यांच्या जर काही शंका असल्यास अर्जदारांचे नामनिर्देशन रद्द करणे, इ. संबंधित विकासकाने पूर्ण करणे. सोडतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करून त्यांची यादी संबंधित विकासकाकडे पाठविल्यानंतर पुढील कारवाईसाठी सिडको जबाबदार राहणार नाही, असे स्पष्टीकरण सिडकोने दिले आहे.