कसा असणार म्हाडाचा गोरेगाव येथील नवीन 2 BHK फ्लॅट? पहा सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती

Mumbai : मुंबईत स्वस्तात घर मिळावं व तेही पंचतारांकीत सोसायटीत असावं असे प्रत्येकाला वाटतं. तुम्हालाही हे करायचे असेल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील गोरेगाव येथील म्हाडाच्या पंचतारांकित इमारतीचे लवकरच लोकार्पण होणार आहे. गोरेगाव येथे गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत म्हाडाने प्रथमच 39 मजली निवासी इमारत बांधली आहे. या इमारतीत रहिवाशांना पंचतारांकित सुविधा देण्यात येणार आहेत.

या गृहप्रकल्पात जलतरण तलाव, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, मैदान, जिम अशा सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तुम्हालाही या गृहनिर्माण प्रकल्पात घर हवे असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या प्रकल्पाचे काम जून 2024 मध्ये म्हणजे या वर्षी पूर्ण होणार आहे.

म्हाडा हक्काच्या घराबरोबरच आलिशान सुविधांची भेट देणार आहे. म्हाडा ‘पहाडी गोरेगाव’ येथे मध्यम उत्पन्न गटासाठी, आलिशान सुविधांनी सुसज्जित 2 बीएचके सदनिकांचा शानदार गृहप्रकल्प उभारत आहे.

म्हाडाच्या या निर्णयामुळे ध्यमवर्गीयांना चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. गोरेगाव येथील या निवासी प्रकल्पाचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार असून म्हाडा प्राधिकरणाने 39 मजली इमारतीतील उच्च व मध्यम गटातील ईच्छुकांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता होणाऱ्या सोडतीमध्ये या घरांचा समावेश केला जाणार आहे.

पहा खालील व्हिडिओत गोरेगाव येथील नवीन 2 BHK फ्लॅट

वाचा : म्हाडाची मुंबई, ठाणे, पुण्यात घरांसाठी मोठी लॉटरी..! पहा लोकेशनसह संपूर्णन माहिती

Leave a Comment