म्हाडाची मुंबई, ठाणे, पुण्यात घरांसाठी मोठी लॉटरी..! पहा लोकेशनसह संपूर्णन माहिती

Mumbai 2 bhk flat : घरांच्या किंमती महाग होत असताना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मध्यमवर्गीयांना आता परवडणारी घरे मिळू शकणार आहेत. म्हाडाचे 13 हजार घरे विक्रीसाठी उपलब्धत होणार आहेत . मुंबई-पुणे-ठाणे येथील घरांचा समावेश असणार आहे. ही घरे या शहरात कुठे असणार आहेत याबाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

मुंबईकरांसाठी म्हाडाचा एक प्राईम लोकेशनला प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत म्हाडा मुंबईत 3660 घरे विकणार आहे. ही घरे परवडणारी आहेत आणि विविध उत्पन्न गटातील लोकांना ती उपलब्ध करून दिली जाणार आहे. या घरांच्या माध्यमातून मुंबईत घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. (You can buy houses in Powai, Magathane, Kannamwar Nagar, Pahari Goregaon.)

पवई, मागाठाणे, कन्नमवार नगर, पहाडी गोरेगाव, या ठिकाणी तुम्हाला घरे (Mumbai 2 bhk flat) खरेदी करता येणार आहेत. म्हाडाने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मुंबईत 4082 घरांसाठी लॉटरी काढली होती. या घरांसाठी म्हाडाकडे 1 लाख 22 हजार अर्ज आले होते. यानंतर आता 3600 घरांसाठी लॉटरी काढणार असल्याचे समजत आहे.

म्हाडाची घरे पाहण्यासाठी येथे क्लीक करा

2023 मध्ये मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या 4082 घरांच्या लॉटरींपैकी 150 घरांची अद्याप विक्री झालेली नाही. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना मागील सोडतीतील उर्वरित घरांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट असलेल्या अर्जदारांना पैसे भरून घर खरेदी करण्याची आणखी एक संधी दिली जाईल. या संधीनंतरही घरे विकली गेली नाहीत, तर पुढील लॉटरीत या घरांचा समावेश केला जाईल.

1 thought on “म्हाडाची मुंबई, ठाणे, पुण्यात घरांसाठी मोठी लॉटरी..! पहा लोकेशनसह संपूर्णन माहिती”

Leave a Comment