मुंबई : गेल्या दीड वर्षापासून एकीकडे मुंबई व उपनगरांतील घरांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ झालेली असली तरी घर भाड्याने घेण्याचा ट्रेंड आजही जोमात आहे. कोविड काळानंतर आता भाड्याने घर (2 BHK flat in Mumbai) घेताना लोक प्रामुख्याने २ बीएचके घरांना पसंती देत असल्याची माहिती गृहनिर्माण क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे.
कोविड काळामध्ये अनेक लोकांनी वर्क फ्रॉम होम केले. घरातून काम करताना घरात आणखी एका वेगळ्या खोलीची आवश्यकता असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. आजही बरेच लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत किंवा हायब्रीड पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे घरातदेखील ऑफिसचा छोटेखानी सेटअप लोकांनी केला आहे.
या खेरीज दुसरे प्रमुख कारण म्हणजे, 2 बीएचके घर भाड्याने घेणाऱ्या लोकांमध्ये प्रामुख्याने भरणा हा तरुणाईचा आहे. कारंण करिअरमध्ये जर दुसऱ्या देशात किंवा शहरात संधी आली तर तिथे जाण्याकडे तरुणाईचा कल आहे. त्यामुळे घर विकत घेऊन गुंतवणूक करण्यापेक्षा भाड्याने घर घेणे अधिक सयुक्तिक असल्याचे या लोकांचे मत आहे.
3 बीएचकेची स्थिती काय आहे? 3 BHK flat in Mumbai
3 बीएचके किंवा त्यापेक्षा मोठे घर भाड्याने घेण्याचे प्रमाण केवळ 7 टक्के आहे. ही घरे प्रामुख्याने विविध कॉर्पोरट कंपन्यांतील उच्चाधिकाऱ्यांनीच भाड्याने घेतल्याचे दिसून येत आहे.
अंधेरी, वांद्रे, बीकेसी, लोअर परळ या परिसरात अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. मुंबईत सुरू असलेल्या विकासकामांमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वेळेत बचत करण्यासाठी वरिष्ठ पदांवर काम करणाऱ्या लोकांनी कार्यालयाच्या नजीक आणि मोठी घरे घेतल्याचे दिसून येत आहे.
शहर, उपनगरात 1 बीएचके तेजीतच | 1 bhk flat in Mumbai
मुंबई व उपनगरात आजच्या घडीला जी एकूण घरे भाड्याने दिली जात आहेत त्यामध्ये 2 बीएचके घरांचे प्रमाण हे 42 टक्के इतके आहे. त्या खालोखाल 1 बीएचके घरे भाड्याने दिली जात आहेत. त्यांचे प्रमाण 31 टक्के इतके आहे. पती-पत्नी आणि त्यातही दोघेही कामावर जाणारे असतील तर असे दाम्पत्य 1 बीएचके घर भाड्याने घेण्याला पसंती देताना दिसत आहे.
मुंबईत चार हजारात मिळतेय भाड्याने घर? वाचा इथे क्लीक करून
किती भाडे मोजावे लागते?
मुंबईत विभागनिहाय सरासरी 2 बीएचके घरांचे भाडे हे 35 ते 65 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. वन-बीएचके घरांसाठीदेखील विभागनिहाय घराचे भाडे किमान 20 हजार ते 50 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. घराच्या भाड्याचे सर्वाधिक दर हे मध्य-मुंबई आणि दक्षिण मुंबईमध्ये आहेत.
पुनर्विकासाचे प्रकल्प
याचसोबत तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मुंबई उपनगरात आजच्या घडीला पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. मूळ इमारतीचे काम सुरू असताना दुसरीकडे हे लोक भाड्याने राहात आहेत. अशा लोकांनीदेखील 2 बीएचके घरांना पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
वाचा : नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, सिडको लॉटरी संधर्भात महत्वाची बातमी
2 thoughts on “मुंबईत भाड्याच्या घरासाठी 2 BHK’चा ट्रेंड..! जाणून घ्या एरिया नुसार घर भाडे”