गेल्या पाच वर्षांत सिडकोने विविध भागांसाठी विविध गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून सुमारे तीस हजार घरांची योजना जाहीर करून त्यांची संगणकीकृत लॉटरी काढली. मात्र, विविध कारणांमुळे हजारो घरे विकली गेली नाहीत. विशेष म्हणजे यातील बहुतांश घरे तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये आहेत. त्यापैकी 3,322 घरांची योजना प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आली आहे. या घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल होती. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार संगणकीकृत सोडतीसाठी 19 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यापूर्वी 19 एप्रिल रोजी होणारी सोडत पुढे ढकलून 7 जून रोजी होणार होती.
घरांनसाठी मोबाईलवर अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
लॉटरीत असणाऱ्या घरांची माहिती
विक्रीसाठी उपलब्ध 3,322 घरांपैकी द्रोणागिरी नोडमध्ये 61 आणि तळोजा येथे 251, एकूण 312 सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. सर्वसाधारण वर्गासाठी एकूण 3,010 सदनिका उपलब्ध आहेत, ज्यात द्रोणागिरीतील 374 आणि तळोजा नोडमध्ये 2,636 सदनिका आहेत. त्यापैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 312 सदनिकांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे; मात्र, संबंधित विभागाच्या विविध प्रयत्नांनंतरही सर्वसाधारण घटकांसाठी असलेल्या 3,010 सदनिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही घरे विकण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर आहे.
वाचा : गुड न्यूज ! म्हाडाचा फ्लॅट घेण्याची शेवटची संधी, 1 आणि 2BHK घरांसाठी इथे करा अर्ज