Mumbai Mhada Homes : मुंबई महाननगरीत दररोज अनेक लोक येतात, रोजगाराच्या शोधात मुंबईत येणाऱ्या अनेकांना या शहराने आपलेसे केले आहे. मात्र, अजूनही काही मंडळी या शहरात स्वत:चं स्थान बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नोकरी, आर्थिक स्थैर्य मिळाल्यानंतर काही लोक या शहरात योग्य घराच्या शोधात असतात.
सध्या मुंबई शहरातील प्रमुख निवासी भागात घरांच्या किमती झपाट्याने वाढल्याने काही लोकांनी घर घेण्याचा विचार सोडून दिला आहे. मात्र, अजूनही काही लोक हे स्वप्न जोपासतात आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू असतात. अशा सर्व मंडळींसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या वर्षी म्हाडाकडून मुंबईत 3600 नवीन घरे बांधली जाणार असून विविध उत्पन्न गटातील नागरिकांना या घरांसाठी अर्ज करता येणार आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी म्हाडाची ही तरतूद असून ही घरे गोरेगाव, अँटॉप हिल, कन्नमवार नगर, पवई, मागाठाणे भागात बांधण्यात येणार आहेत. म्हाडा नजीकच्या काळात या घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे, त्यामुळे अनेकांना त्यांचे परिपूर्ण घर घेण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावावा लागणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2023 मध्ये 4082 घरांची लॉटरी काढण्यात आली. परंतु, या भागातील दीडशे घरांची अद्याप विक्री झालेली नाही. सध्या ज्या अर्जदारांची नावे प्रतीक्षा यादीत आहेत, त्यांना ही घरे देण्याची प्रक्रिया सुरू असून, यातून घरे विकली गेली नाहीत, तर येत्या काळात या 150 घरांचा लॉटरीत समावेश होऊ शकतो. दरम्यान, आगामी लॉटमधील घरांच्या किमती जाहीर करण्यात आल्या नसल्या तरी, ही घरे सर्व उत्पन्न गटांसाठी उपलब्ध असतील.
तरी या संधर्बात कोणतीही नवीन अपडेट आल्यास आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहचवू..! म्हाडाचे घर घेणाऱ्या ईच्छुकांनी त्यांचे कागदपत्रे तयार ठेवावी त्याची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
आधारकार्ड, पॅनकार्ड, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, स्वतःच्या उत्पन्नाचा पुरावा (प्राप्तिकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला), जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच इतर प्रवर्गानुसार प्रमाणपत्र, स्वघोषणापत्र.