वाशी, जुईनगर, खारघर मानसरोवर, उलवे, कळंबोली येथे घर घेण्याची संधी । property in mumbai

property in mumbai

मुंबई : म्हाडानंतर आता सिडको घरांच्या लॉटरीची जाहिरात काढणार असल्याचे समजते. लॉटरीत तब्बल 5000 घरांची शक्यता आहे. सिडकोही याचे नियोजन करत आहे. सिडकोने टप्प्याटप्प्याने घरांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेसाठी स्वतंत्र संगणकीकृत प्रणाली तयार करण्यात आली आहे. वाशी, जुईनगर, खारघर मानसरोवर, उलवे, कळंबोली येथे ही घरे आहेत.

सिडको नवी मुंबईत गृहसंकुल बांधणार आहे. नावडे नोडमध्ये सिडको दोन खोल्यांचे घर बांधणार आहे. यामुळे घर घेण्याचे मध्यमवर्गीयांचे स्वप्न साकार होणार आहे. नावडे या नवीन विकसनशील नोडमध्ये मध्यमवर्गीयांसाठी स्वतंत्र टाऊनशिप उभारण्याचा प्रस्ताव सिडकोने ठेवला आहे. यंदा या घरांची घोषणा होण्याची शक्यता आहे. खासगी विकासकांच्या तुलनेत ही घरे स्वस्त असतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे नवी मुंबईतील लहान घर खरेदीदारांची इच्छा पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांत सिडकोने दोन टप्प्यात 25 हजार घरांची योजना राबविली. त्यापैकी सुमारे सात हजार घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत. अनेक ग्राहकांनी देयके भरण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे त्यांची काही घरे परत घेतली आहेत.

घरांनसाठी मोबाईलवर अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा