मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. हे लक्षात घेऊन म्हाडा आणि सिडको कमी किमतीत घरे देत आहेत. आता सिडकोने महागृह निर्माण योजना 2024 जाहीर केली आहे.
या सिडको लॉटरीच्या माहितीसाठी https://lottery.cidcoindia.com या वेबसाइटला भेट द्या. अर्ज कसा करायचा, घरांची किंमत, कुठे आणि किती घरे, उत्पन्न मर्यादा काय, अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची संपूर्ण माहिती माहितीपत्रकात उपलब्ध आहे. या लॉटरीची अधिकृत सूचना पाहण्यासाठी lottery.cidcoindia.com या लिंकवर क्लिक करा.