Mumbai 2 bhk flat : स्वतःचे घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. या घरांसाठी नागरिक अनेक दिवसांपासून प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. शेवटी, जेव्हा घराचे हे स्वप्न सत्यात उतरते तेव्हा आनंद गगनात मावेनासा असतो. अशा परिपूर्ण घराच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण आता म्हाडाचा आणखी एक प्रकल्प तुमचे स्वप्न पूर्ण करण्यात हातभार लावणार आहे.
मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे मुंबईत स्वतःचे घर घेणे हे अनेकांचे स्वप्न असते. मुंबई शहर किंवा उपनगरात कमी किमतीत घर मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. जर तुम्ही मुंबईत घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही तुमचे घर मुंबईत वाजवी दरात खरेदी करू शकता. कारण महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) सप्टेंबरमध्ये मुंबईतील सुमारे दोन हजार घरांसाठी लॉटरी काढण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय गोरेगाव येथील गृहप्रकल्पातील पॉश घरांचाही या लॉटरीत समावेश होणार आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी मुंबई मंडळाची लॉटरी काढण्यात आली होती.त्यापैकी 1.22 लाख लोकांनी 4082 घरांसाठी अर्ज केले होते. ज्यांना या लॉटरीत घर लागले नाही त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध भागातील तयार घरांची माहिती गोळा केली जात आहे.येत्या काही महिन्यांत मुंबईत सुमारे दोन हजार घरे तयार होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या घरांची लॉटरीसाठी निवड करण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लीक करा
2023 मध्ये मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या 4082 घरांच्या लॉटरींपैकी 150 घरे न विकली गेली आहेत. शेवटच्या सोडतीत 196 अर्जदारांकडे एकापेक्षा जास्त घरे होती. नियमानुसार कोणताही अर्जदार एकापेक्षा जास्त घर घेऊ शकत नाही. यानंतर अर्जदारांनी घरे म्हाडाला परत केली. त्याच वेळी, सुमारे 200 विजेत्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी किंवा चुकीची माहिती आढळून आली. यानंतर प्रतीक्षा यादीतील लोकांनाही ही घरे देण्यात आली आहेत. सध्या केवळ 150 घरे विक्रीसाठी शिल्लक आहेत.
याशिवाय गोरेगाव येथील म्हाडाच्या आधुनिक इमारतीतील सुमारे 332 घरांचाही लॉटरीत समावेश होणार असून, ही घरे उच्च व मध्यमवर्गीय असतील. उच्च वर्गाची घरे सुमारे 979 चौरस फूट आणि मध्यमवर्गीय घरे सुमारे 714 चौरस फूट असतील. उच्च श्रेणीतील घरांची किंमत सुमारे 1.25 कोटी रुपये आहे आणि मध्यमवर्गीय घरांची किंमत 80 लाख रुपये आहे. म्हाडाने प्रथमच गोरेगावच्या इमारतींमध्ये जिम, स्विमिंग पूल आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटची व्यवस्था केली आहे. यापैकी सुमारे 80% घरे पूर्ण झाली आहेत, सध्या काम अंतिम टप्प्यात आहे. दोन ते अडीच महिन्यांत घरे तयार होतील.