मुंबईत 173 दुकानांचा ई-लिलाव कधी? वाचा सविस्तर बातमी । Property in Mumbai

मुंबई : म्हाडाने 11 आणि 12 जून रोजी मुंबईतील 173 दुकानांचा ( Property in Mumbai ) ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता तांत्रिक अडचणींमुळे हा ई-लिलाव लांबणीवर पडला आहे.

जमा रकमेसह सुमारे 550 अर्ज ई-लिलावासाठी सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे हे 550 अर्जदार या प्रक्रियेत सहभागी होतील. ई-लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या दुकानांचा मंगळवारी (11 जून) किंवा बुधवारी (12 जून) ई-लिलाव करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. मात्र आता या प्रक्रियेला विलंब होत आहे. तांत्रिक कारण सांगून लिलाव लांबल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment