Mhada lottery 2024 : म्हाडाच्या घरांची वाट पाहताय? यंदा 13 हजार घरांची बंपर लॉटरी

Mhada lottery 2024 : प्रत्येकाला एक हक्काचं घर असावे अशी अपेक्षा असते. पण, हे स्वप्न प्रत्येक वेळी पूर्ण होत नाही. जेव्हा घर खरेदी करण्याचा विचार येतो तेव्हा सर्वात मोठा आणि तितकाच महत्त्वाचा घटक म्हणजे आर्थिक पाठबळ. घरासाठी अनामत रक्कम भरण्यापासून ते गृहकर्ज आणि घराच्या नूतनीकरणाचा खर्च यामुळे अनेक गणिते चुकतात आणि बिघडतात.

आता निदान घर घेण्याचे स्वप्न तरी या हिशोबामुळे भंगणार नाही. कारण, हे स्वप्न साकार करण्यासाठी पुन्हा एकदा म्हाडाची खूप मदत होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, राज्यातील सर्वसामान्यांना योग्य दरात घरे देण्यासाठी म्हाडा आता 2024-25 या आर्थिक वर्षात 13 हजार 46 घरे बांधणार आहे. यामुळे, अधिकाधिक मंडळींचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल.

Mhada lottery 2024

या घरांच्या बांधकामासाठी म्हाडाकडून 8310 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असून पुणे, मुंबई, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विभागीय मंडळांमध्ये ही घरे बांधण्यात येणार आहेत. ही घरे म्हाडाकडून कमी दरात दिली जात असल्याने सर्वसामान्यांकडूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे.

दरम्यान, म्हाडा येत्या काळात या घरांची लॉटरीही काढणार आहे. अर्जदारांची संख्या लक्षात घेता या टप्प्यातील घरांची संख्याही मोठी असल्याने अनेकांच्या स्वप्नांना नक्कीच नवसंजीवनी मिळणार आहे. म्हाडा मुंबईत 3660, पुण्यात 1506 आणि कोकणात 5122 घरे बांधणार आहे. त्यासाठी अनुक्रमे 5326.87 कोटी, 473.78 कोटी आणि 1460.15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात घरांचा हा महत्त्वाकांक्षी टप्पा गाठण्यासाठी म्हाडाने कामाला सुरुवात केली असून, आता सोडतीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाचा : कागदपत्रे ठेवा तयार..! मुंबईत मोक्याच्या ठिकाणी तयार झाले म्हाडाचे प्रकल्प, पाहा सविस्तर माहिती

2 thoughts on “Mhada lottery 2024 : म्हाडाच्या घरांची वाट पाहताय? यंदा 13 हजार घरांची बंपर लॉटरी”

Leave a Comment