Ladki Bahin Yojana Application Form : सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. त्यापूर्वी महिलांना अर्ज करावा लागेल. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना काही कागदपत्रांची पूर्तताही करावी लागणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत काही बदलही करण्यात आले आहेत.
योजनेसाठी असा करा अर्ज
या योजनेसाठी महिलांना अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन करावा लागेल. अर्ज अगदी सोप्या पद्धतीने करता येतो. यासाठी महिलेला आधी तिचे पूर्ण नाव लिहावे लागेल. विवाहित असल्यास लग्नापूर्वीचे नाव आणि लग्नानंतरचे पूर्ण नाव लिहावे लागते.
जन्मतारीख आणि पूर्ण पत्ता लिहिणे देखील महत्त्वाचे आहे. जन्म ठिकाण आणि पिन कोड देखील आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक देखील आवश्यक आहे. या अर्जात विचारण्यात आलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संबंधित महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत आहे का? जर होय तर तिथे लिहावे लागेल. महिलांना अर्जात वैवाहिक स्थितीची माहितीही द्यावी लागणे बंधनकारक आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी इथे क्लीक करून फॉर्म डाउनलोड करा
यासोबतच बँकेची संपूर्ण माहिती आणि बँकेचा खाते नंबरही अर्जात मागवण्यात आला आहे. ते योग्य पद्धतीने द्यायला हवे. बँकेचा क्रमांक आधार कार्डशी लिंक आहे का? अशी विचारणाही अर्जात करण्यात आली आहे. तुम्ही भरलेला अर्ज अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहाय्यिका, पर्यवेक्षक, ग्राम सेवक, प्रभाग अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यांच्याकडून तपासू शकता.
लाडकी बहीण योजनेसाठी ही कागदपत्रे आवश्यक
आधार कार्ड
अधिवास\जन्म प्रमाणपत्र
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
अर्जदाराचे हमीपत्र
बॅंक पासबुक
अर्जदाराचे फोटो
इथे जमा करा भरलेला अर्ज
अर्जदाराने भरलेला अर्ज संबंधित अंगणवाडी केंद्रात जमा करावा लागेल. तुम्ही सेतू सुविधा केंद्रावरही अर्ज सबमिट करू शकता. राज्यभरातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी दिसून येते. उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठीही लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि आधार अपडेट्स अपडेट करण्यासाठीचे सर्व्हरही अनेक ठिकाणी संथ असल्याचे दिसून येत आहे.
वाचा : म्हाडाच्या घरांची वाट पाहताय? यंदा 13 हजार घरांची बंपर लॉटरी
Ladki bahil yojana