मुंबई : मुंबईत मध्यमवर्गीयांना व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी आता सुवर्णसंधी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत 173 दुकानांच्या विक्रीसाठी, पात्र व्यक्तींसाठी 27 जून 2024 रोजी www.eauction.mhada.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन बोली स्वरूपात ई-लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यात आपण सहभागी होऊन ऑनलाईन बोली लावू शकणार आहे.
दुकानांच्या विक्रीसाठी नोंदणी केलेल्या, आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेल्या आणि अनामत रक्कम जमा केलेल्या पात्र अर्जदारांसाठी संगणकीकृत प्रणालीमध्ये ऑनलाइन बोली 27 जून रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ठेवण्यात आली आहे. ई-लिलावाचा एकत्रित निकाल 28 जून 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता https://mhada.gov.in आणि www.eauction.mhada.gov.in या दोन्ही वेबसाइटवर जाहीर केला जाईल.
मुंबई विभागातील दुकानांचा ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे ई-लिलाव प्रक्रियेचे वेळापत्रक बदलण्यात आले. बदललेल्या वेळापत्रकानुसार ई-लिलावाची तारीख निश्चित करण्यात आली नव्हती. आता आचारसंहिता संपल्यानंतर मंडळाकडून ई-लिलावाची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे.
ई-लिलावात मुंबई विभागाकडून मुंबईतील विविध वसाहतींमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या अनिवासी भूखंडांची संख्या खालीलप्रमाणे आहे.
- प्रतिक्षा नगर-शिव, न्यू हिंदी मिल-माझगाव 2
- स्वदेशी मिल-कुर्ला-05
- गव्हाणपाडा मुलुंड-08
- तुंगा पवई-03
- कोपरी पवई-05
- मजासवाडी जोगेश्वरी पूर्व-01
- शास्त्रीनगर गोरेगाव-01
- सिद्धार्थनगर येथे 15 दुकाने
- गोरेगाव-01
- बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व- 17
- मालवणी-मालाड- 57
- चारकोप प्लॉट क्रमांक 1- 15
- चारकोप प्लॉट क्रमांक 2- 15 दुकाने
- चारकोप प्लॉट क्रमांक 3-4
- जुनी मागाठाणे बोरिवली पूर्व- 12
- महावीर नगर कांदिवली पश्चिम – 12 दुकाने बोलीसाठी उपलब्ध असतील.
ई-लिलावात सहभागी होण्यासाठी येथे क्लीक करा
मुंबई मंडळाच्या या ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी, वेबसाइटवर नोंदणी करा, ऑनलाइन अर्ज करा, कागदपत्रे अपलोड करा, 1 मार्च 2024 रोजी सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत जमा करा. 06 जून 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
Hey people!!!!!
Good mood and good luck to everyone!!!!!
Hello!
Good luck 🙂