MHADA Lottery: आता केवळ आधार कार्डद्वारे खरेदी करा स्वप्नातले घर, जाणून घ्या कसे

MHADA flats Mumbai : मुंबई किंवा त्याच्या लगतच्या परिसरात घर घेण्याचं प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचे स्वप्न असतं. मात्र, घरांच्या किमती गगनाला भिडल्याने प्रत्येकाला मुंबई महानगरात घर खरेदी करणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन म्हाडा कमी किमतीत घरांची विक्री करत आहे. त्यासाठी म्हाडाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे तुम्ही गृहनिर्माण लॉटरीसाठी अर्ज करू शकता. मात्र आता म्हाडाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याच्या मदतीने तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्डद्वारे नोंदणी करून घर खरेदी करू शकता.

आता फक्त आधार आणि पॅन कार्डद्वारे नोंदणी करून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या ‘विरार-बोलिंगे’ मध्ये स्वस्त दरात तुमचे स्वप्नातील घर खरेदी करा. या योजनेत तुमच्या नानावर कितिही घरे असली तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर घरांचे वितरण करण्यात येणार आहे. मग त्वरा करा.अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा..!

अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

मुंबईला लागून असलेल्या विरार-बोळींज भागातील घरांसाठी म्हाडाने लॉटरी काढली होती. या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने पहिल्यांदाच नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या लॉटरीत घर घेण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्र, जातीचा दाखला अशी कागदपत्रे म्हाडाच्या पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक होते. मात्र आता विरार आणि बोळींज भागातील घरांच्या विक्रीसाठी हे नियम बदलण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.

मुंबई जवळ अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या विरार परिसरात म्हाडाची सुमारे पाच हजार घरे आहेत. या पाच हजार घरांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने आतापर्यंत अनेक वेळा लॉटरी काढल्या आहेत. मात्र लोकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे तुम्ही या भागात एका पेक्षा जात घरेही खरेदी करू शकणार आहेत.

विरारमध्ये वन बीएचके आणि टू बीएचके फ्लॅट आहेत. वन बीएचके फ्लॅटची किंमत अंदाजे 23,28,566 रुपये आहे. तर टू बीएचके फ्लॅटची किंमत सुमारे 41,81,834 रुपये आहे. या घरांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्डद्वारे नोंदणी करून अर्ज करता येतो. पैसे जमा केल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत अर्जदाराला घराच्या चाव्या दिल्या जातील, असे सांगण्यात आले आहे. यासाठी तुम्हाला म्हाडाच्या वेबसाइटवर अर्ज करावा लागेल.

विरार परिसरात पाण्याची समस्या आहे. त्यामुळे नागरिकांकडून येथे अत्यल्प प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. मात्र येत्या महिनाभरात पाण्याच्या पाईप लाईनचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे पाण्याची समस्या सुटल्यास या घरांना मोठी मागणी येण्याची शक्यता आहे.

वाचा : द्रोणागिरी, तळोजा नोडमधील घरांच्या सोडतीची तारीख जाहीर? अर्जदार संभ्रमात | 2 bhk flat Mumbai

Leave a Comment