Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना सरकार दरमहा 1,500 रुपये देणार आहे. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेचा लाभ कसा आणि कोणाला मिळू शकतो? तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होऊ शकतात. यासाठी सविस्तर माहिती आपण पाहणणार आहोत.
सुमारे एक कोटी महिलांना माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1500 रुपये दिले जातील. यासाठी महत्वाची अट म्हणजे 2 लाख 50 हजार 500 रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न पाहिजे.
लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 60 वर्षे आहे. योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
डोमेसाइल प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला
उत्पन्नाचा दाखला
पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
फोटो
रेशनकार्ड
अर्ज कसा करावा
संपूर्ण अर्ज प्रक्रिया विनामूल्य असेल. योजनेचे अर्ज ऑनलाइन भरले जाऊ शकतात. ज्या महिलांना ऑनलाइन अर्ज भरता येत नाहीत, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्र/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/प्रभाग/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असेल.
वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्र/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (शहरी/ग्रामीण/आदिवासी)/सेतू सुविधा केंद्रातील नियुक्त कर्मचाऱ्यांकडून ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल आणि यशस्वीरित्या दाखल केलेल्या प्रत्येक अर्जासाठी योग्य पोचपावती दिली जाईल.
महिला अर्जदाराला त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागेल जेणेकरून तिचा फोटो थेट काढता येईल आणि ई-केवायसी करता येईल. यासाठी 1 जुलै 2024 अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होईल. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिवस 15 जुलै 2024 आहे.
योजनेत मोबाईलवर अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
कोणत्या महिला अपात्र असतील?
ज्यांच्या कुटूंबाचे एकत्रिक वार्षिक उत्पन्न रु.2 .50 लाखांपेक्षा अधिक आहे अश्या महिला पात्र नाहीत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत याना या योजनेत लाभ मिळणार नाही. परंतु कंत्राटी कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची एकूण पाच एकरपेक्षा जास्त शेतजमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) आहेत त्यांना या योनतेचा लाभ घेता येणार नाही.
वाचा : म्हाडा निर्माणाधीन प्रकल्पातील घरांसाठी लॉटरी काढणार! वाचा काय आहे सर्वसमावेश गृहयोजना
Hi sir/ mam
Mala gharachi awashkta khup ahe maji 4 mule ahet majya husband la Moti Nokari nahi ahe ki Ami ghar ghevu shkto.
Amla gharachi awashkta khup ahe
Thank u