मुंबईतील म्हाडाच्या 173 दुकानांचा ई- लिलाव..! विजेत्यांची नावे जाहीर?

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांचा ई-लिलाव अखेर गुरूवारी पार पडला असून त्यातील विजेत्यांची नावे शुक्रवारी जाहीर करण्यात येतील.

म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पात रहिवाशांच्या गरज लक्षात घेऊन दुकानेही बांधली जातात. दुकानांची विक्री ई लिलाव पद्धतीने म्हाडाकडून केली जाते. दुकानांसाठी म्हाडाकडून निश्चित अशी बोली लावली जाते आणि त्या बोलीपेक्षा अधिक बोली लावणाऱ्यास दुकान विकले जाते. अशाप्रकारे आतापर्यंत मुंबईतील शेकडो दुकानांचा ई लिलाव करण्यात आला आहे.

परडवणाऱ्या दरात दुकान घेता येत असल्याने ई-लिलावाला चांगला प्रतिसादही मिळतो. मात्र मागील काही वर्षांत दुकानांची विक्रीच झालेली नाही. ही बाब लक्षात घेता विक्रीवाचून रिक्त असलेल्या 173 दुकानांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला. त्यानुसार या 173 दुकानांसाठी मार्चमध्ये नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच संपुष्टात आली असून अंदाजे 550 अर्जदार या ई लिलावासाठी पात्र ठरले आहेत.

विजेत्यांची नावे पाहण्यासाठी येथे क्लीक करा

गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून ई लिलावास सुरुवात झाली आणि सायंकाळी वाजेदरम्यान बोली लावण्याची प्रक्रिया पार पडली. आता शुक्रवारी सकाळी 11 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर विजेत्यांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत. दरम्यान प्रत्यक्षात किती दुकानांना प्रतिसाद मिळतो त्यावर मंडळाला किती महसूल मिळणार हे शुक्रवारी स्पष्ट होईल.

वाचा : ‘म्हाडा’ची किती घरे घेता येतात? लॉटरी शिवाय घरे मिळतात का?

Leave a Comment