MHADA Lottery Mumbai 2024 : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाच्या घरांची सोडत काढण्यात येणार आहे. याद्वारे घरांची ब्लू प्रिंट काढण्यात येणार आहे. म्हाडा प्रथमच मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी उच्च दर्जाच्या सोयीसुविधा असणारे घरे बांधत आहे. या आलिशान परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडा किंमत किती आकारणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
येत्या दिवाळीत म्हाडा घरांसाठी लॉटरी काढणार आहे. हा म्हाडाचा पहिला हायफाय प्रकल्प आहे. गोरेगाव रेल्वे स्टेशनपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या प्रकल्पात जिम, स्विमिंग पूल, क्लब हाऊस यासारख्या उच्च दर्जाच्या सुविधा आहेत. मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोक या घरांसाठी अर्ज करू शकतील.
गोरेगाव येथील प्रेमनगर येथे 39 मजली टॉवर उभारण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. सध्या 39 मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प मार्च 2015 पर्यंत पूर्ण करण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. मात्र, कामाचा वेग पाहता येत्या दिवाळीपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
तुम्ही अजूनही म्हाडाचे रजिस्ट्रेशन केले नसेल तर आताच करून घ्या. कारण लॉटरी जाहीर झाल्यांनंतर फॉर्म भरताना आधी म्हाडाचे रजिस्ट्रेशन करावे लागते त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतो. तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही वरील नंबरवर कॉल करून सेवा शुल्क देऊन फॉर्म भरू शकतात.
अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
रद्द केलेला चेक
पत्त्याचा पुरावा
आयडी फोटो
जन्म प्रमाणपत्र
अर्जदाराचे संपर्क तपशील
वाचा : गोरेगाव येथील म्हाडाच्या घरांच्या किमतीत मोठी वाढ । Goregaon 2 bhk flat