2 bhk flat Mumbai : लोकसभा आणि त्यापाठापोठ विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सिडकोच्या घरांची पूर्वनियोजित ७ जून रोजीची संगणकीय सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. सिडकोच्या संबंधित विभागाने तशा आशयाचे संदेश संबंधित अर्जदारांना पाठविले आहेत. असे असले तरी सोडतीची पुढची तारीख कोणती, याबाबत कोणतीही सूचना दिली गेली नसल्याने अर्जदारांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
द्रोणागिरी आणि तळोजा नोडमधील विविध गृहप्रकल्पांतील (2 and 3 bhk flats in mumbai) a शिल्लक ३,३२२ घरांची योजना सिडकोने प्रजासत्ताक दिनी जाहीर केली आहे. या घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १६ एप्रिल होती; तर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार संगणकीय सोडतीसाठी १९ एप्रिलचा दिवस निश्चित केला होता.
मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे १९ एप्रिलची पूर्वनियोजित सोडत पुढे ढकलून ७ जूनचा मुहूर्त निश्चित केला. आता निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल केली असली तरी विधान परिषदेच्या कोकण, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने ७ जूनची पूर्वनियोजित सोडत रद्द केल्याचे संबंधित अर्जदारांना कळविले आहे. मात्र सोडतीची नवीन तारीख जाहीर केलेली नाही.
अनामत रक्कम सिडकोच्या तिजोरीत | 3 bhk flats in mumbai
अर्जदारांत संभ्रम निर्माण झाला आहे. या घरांची योजना जाहीर करून सहा महिने उलटले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटक या दोन प्रवर्गासाठी या सदनिका आहेत.
अर्जासोबत अर्जदारांनी अनुक्रमे ७५ हजार आणि दीड लाख रुपये अनामत रक्कम भरली आहे. सहा महिने सोडत न निघाल्याने ही अनामत रक्कम सिडकोच्या तिजोरीत पडून आहे. या दोन्ही प्रवर्गात घरासाठी अर्ज करणारे बहुतांश अर्जदार सर्वसामान्य आर्थिक श्रेणीतील आहेत.
आमच्या दृष्टीने ७५ हजार आणि दीड लाख ही रक्कम मोठी आहे. त्यामुळे सिडकोने तातडीने घरांची संगणकीय सोडत काढावी, अशी मागणी अर्जदारांकडून केली जात आहे.