सिडको काढणार लॉटरी, नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

नवी मुंबई : घर (property in mumbai) खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला नवी मुंबईत तुमचे हक्काचे घर मिळण्याची शक्यता आहे. सिडको घरांसाठी लॉटरी काढणार आहे. सिडकोने टप्प्याटप्प्याने घरांची विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

गेल्या दोन वर्षांत सिडकोने दोन टप्प्यात 25 हजार घरांची योजना राबवली. त्यापैकी सुमारे सात हजार घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत. अनेक ग्राहकांची काही घरे पैसे भरण्यास असमर्थता दर्शविल्याने पुन्हा ताब्यात घेण्यात आली आहेत. यासंदर्भात सिडकोने जाहिरातही काढली होती. मात्र, त्याचे कोणतेही उत्तर मिळाले नाही. आता पुन्हा एकदा सिडकोने घरांची लॉटरी लावली आहे. प्रस्तावित घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकण्याची योजना आहे.

नवी मुंबईत गृहसंकुल उभारले जाणार आहे. तसेच ठाण्यात लवकरच लॉटरी काढण्यात येणार आहे. आता सिडकोने दोन खोल्यांच्या घराचा नवा पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत सिडकोने दोन टप्प्यात 25 हजार घरांची योजना राबवली. आता पुन्हा एकदा 5 हजार घरांची लॉटरी निघणार असताना, घरे खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांना ही जाहिरात कधी प्रसिद्ध होणार याची उत्सुकता आहे.

सिडकोची घरे कोठे आहेत? किंमत किती आहे? संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तेथे क्लीक करा

तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला घर घ्यायचेच असेल तर येणाऱ्या लॉटरीत तुम्हाला तुमचे नाशिब अजमायला हरकत नाही. कारणं बाजारभावा पेक्षा कमी दरात तुम्हाला हक्काचे घर फक्त सिडको आणि म्हाडा या संस्था देऊ शकतात. त्यामुळे येणाऱ्या लॉटरीत न चुकता सविस्तर अर्ज भरा आणि हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करा.

वाचा : म्हाडाची पाच हजार घरांची लॉटरी? वांद्रे रेक्लमेशन, आदर्शनगर, अभ्युदयनगर येथे घरे

Leave a Comment