cidco lottery 2024 : सिडको नवी मुंबई आणि परिसरात परवडणाऱ्या दरात घरं आणि व्यावसायिक गाळे स्वरूपात उपलब्ध करून देते. गेल्या अनेक वर्षांत सिडकोच्या अनेक गृहनिर्माण प्रकल्पांनी सर्वसामान्यांचे परिपूर्ण घराचे स्वप्न साकार केले आहे. 2024 च्या सुरुवातीला सिडकोने तळोजा आणि द्रोणागिरीमध्ये 3322 गृहनिर्माण योजना जाहीर केल्या होत्या. त्यानंतर, संपूर्ण प्रक्रियेनंतर, या योजनेच्या सोडतीची संभाव्य तारीख 19 एप्रिल असल्याचे सांगण्यात आले. परंतु, ही तारीख हुकलीहोती.
सिडकोच्या या सोडतीतील ३३२२ घरांपैकी द्रोणागिरी नोडमधील ६१ घरे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तळोजा पंतप्रधान आवास योजनेतील PM Awas Yojana 2024 २५१ घरे, द्रोणागिरीतील ३७४ घरे आणि सर्वसाधारण घटकांसाठी तळोजा येथील २६३६ घरांचे उबलब्ध करण्यात आले आहे. या घरांच्या वाटपासाठी अनेकांनी अर्ज देखील केले होते.
लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर देशात लागू झालेल्या आचारसंहितेमुळे लॉटरी पुढे ढकलण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे न देता थेट वेबसाइटवर देण्यात आल्याने अर्जदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
सिडकोकडून मिळालेल्या माहितीनुसार,cidco lottery 2024 ही प्रलंबित लॉटरी ८ मे रोजी जाहीर होणार असल्याचे संकेतस्थळावरच सांगण्यात आले आहे. मात्र, आचारसंहिता संपत नसल्याने ही सोडत कधी निघणार, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. वास्तविक, देशात जूनच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता संपते . वास्तविक, सिडकोने आता ऑनलाइन सोडतीसाठी ८ मे ऐवजी ७ जून ही तारीख निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.
सिडकोची हजारो घरे अद्याप पडूनच cidco lottery 2024
cidco lottery 2024 सिडकोने गेल्या पाच वर्षांत भाडे प्रक्रियेद्वारे 30,000 हून अधिक घरे सोडत प्रक्रियेतून उपलब्ध करून दिली होती. परंतु, काही कारणांमुळे सिडकोची हजारो घरे अद्याप विकली गेली नाहीत. त्यापैकी तळोजा व द्रोणागिरी येथील घरांची संख्या जास्त असून, त्यापैकी ३३२२ घरांचे नियोजन सिडकोने प्रजासत्ताक दिन २०२४ ला केले होते. आता अर्जदार या योजनेच्या सोडतीच्या प्रतीक्षेत असून त्यांना सोडतीसाठी नवीन तारखा देण्यात येत आहेत. त्यामुळे आता सिडकोची लॉटरी सात जून रोजी जाहीर होणार का आणि त्याचे लाभार्थी कोण ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा : girni kamgar lottery I कोन, पनवेलमधील गिरणी कामगारांचे देखभाल शुल्क आता लवकरच होणार माफ