Ladki Bahin Yojna : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना जाहीर केली होती, ज्यातून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील. मात्र, या योजनेतील काही अटींमुळे अनेक महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नसल्यामुळे या जाचक अटी काढण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
लाडकी बहिन योजनेत टाकण्यात आलेल्या जाचक अटींमुळे अनेक महिला अपात्र ठरणार असल्याने विरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवला. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 07 महत्त्वाच्या अटी रद्द केल्या आहेत.
कोणत्या अटी रद्द करण्यात आल्या आहे
महिलांसाठी 21 ते 60 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली होती, मात्र आता ही मर्यादा 60 वरून 65 वर्षे करण्यात आली आहे. जर कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर कुटुंबातील महिलांना वगळण्यात आले; मात्र आता ही अट शिथिल करण्यात आली आहे.
योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै होती, ती आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्जाचा कालावधी दोन महिन्यांचा असेल. पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
महिला लाभार्थीकडे 15 वर्षापूर्वीचे रहिवासी प्रमाणपत्र नसल्यास, मतदार ओळखपत्र, शाळा पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड स्वीकारले जाईल. कुटुंबातील अविवाहित महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
लाडकी बहिन योजनेच्या नवीन निर्णयानुसार महिला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै महिन्याचे पैसेही मिळतील.
या योजनेत तुम्हाला तीन हजार मिळू शकणार आहेत. त्यासाठी घरातील दोन महिलांनी अर्ज करणे गरजेचे आहे. हा अर्ज करण्यासाठी दोघांनी वेगवेगळे अर्ज भरणे गरजेचे आहे. फॉर्म भरताना एकत्र कुटुंब दाखवायचे नाही. असा फॉर्म भरल्यास तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये महिन्याला मिळू शकता.
वाचा : डिपॉझिट तयार ठेवा..! म्हाडा लॉटरीत मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घरे, पहा फ्लॅटच्या किमती