Mhada flat rental process : म्हाडाची लॉटरी लागल्यावर घर भाड्याने देता येते का? किंवा विकता येते का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. म्हाडाचे घर भाड्याने किंवा विकण्यासाठी काय नियम व अटी आहेत? याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
म्हाडा लॉटरीत घर लागल्यानंतर काही लोकांना अनेक कारणांमुळे बाहेर जावे लागते. कोणाला बदली मुळे जावे लागते तर कोणाला कामानिमित्त बाहेर जावे लागते. अश्या लोकांना त्यांना लागलेली घरे भाड्याने देता आले नाही किंवा विकता आले नाही तर त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती असते. म्हणून म्हाडाचे घर घेत असतांना सगळ्या नियम व अटी समजून घेणे महत्वाचे असते.
म्हाडाचे घर तुम्हाला लागल्यास नियमानुसार तुम्हाला ते घर पाच वर्ष विकता येत नाही. ही घरे जर तुम्ही पाच वर्षांच्या आत विकण्याचा प्रयत्न केलाच तर त्या घरांचे रजिस्ट्रेशन होत नाही किंवा ते घर नावावर केले जात नाही. यामध्ये ही घरे विकण्यासाठी तुम्हाला म्हाडाची NOC घ्यावी लागते. ही NOC तुम्हाला घर घेतल्यापासून म्हणजे पजेशन मिळाल्यापासून पाच वर्ष पूर्ण झाल्यावरच म्हाडा कडून देण्यात येते.
काही ठिकाणी एजंटला हाताशी धरून ही घरे सर्रासपणे विकली जातात. याची कल्पना म्हाडाला सुद्धा आहे. मात्र असे करत असतांना तुमच्यासोबत जर फसवून झालीच तर ही फसवणून तुम्हाला मोठा आर्थिक फटका देऊन जाणारी आहे. म्हणून म्हाडाचे घर पाच वर्ष पूर्ण होई पर्यंत विकण्याचा विचार करू नका. मुंबई सारख्या ठिकाणी हक्काचे घर पुन्हा-पुन्हा घेता येत नाही. म्हाडाच्या नवीन नियमानुसार म्हाडाचे एकच घर तुम्हाला घेता येणार आहे. यामुळे या सर्व गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही पुढील निर्णय घेतला पाहिजे.
म्हाडाचे घर भाड्याने देता येते का?
आता म्हाडाचे घरे पाच वर्ष विकता येत नाही तर भाड्याने देऊ शकतो का? असा प्रश्न अनेक वाचक आम्हाला विचारत असतात. तर याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. म्हाडाने दोन वर्षा पासून घर भाड्याने देण्यासाठी काही नियम अटी घालून दिल्या आहेत. या अटी शर्तीचे पालन करून म्हाडा रीतसर परवानगी देत आहे.
लॉटरी लागल्याच्या नंतर लगेच आपण हे घर भाड्याने देऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला म्हाडाला एक अर्ज करावा लागणार आहे. त्या अर्जात तुम्हाला तुमच्या घराची माहिती देऊन घर का भाड्याने द्यायचे आहे? याची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे. या अर्जात तुम्हाला म्हाडाला पटवून द्यावं लागेल की तुम्हाला काही कारणात्सव त्या ठिकाणी राहणे शक्य होणार नाही. यानंतर तुम्हाला हे पत्र म्हाडा कडे NOC साठी द्यावं लागेल. यानंतर म्हाडाची NOC मिळवण्यासाठी तुम्हाला 1 वर्षासाठी म्हाडाला 3 हजार ते 5 हजार रुपये भरावे लागतील. तुम्हाला म्हाडाला तुमच्या भाडेकरू संदर्भात माहिती द्यावी लागेल यानंतर तुम्हाला NOC मिळणार आहे.
म्हाडाचा अर्ज भरण्यासाठी येथे क्लीक करा
ही प्रोसेस 1 वर्षासाठी आहे. 1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा ही प्रोसेस करून 1 वर्षाचे पैसे भरावे लागणार आहेत. आता काहींना प्रत्येक वर्ष ही प्रोसेस करणे शक्य होणार नसेल तर तुम्ही 3 वर्षासाठी NOC घेऊ शकतात मात्र तुम्हाला 3 वर्षासाठी लागणारे पैसे एकदम म्हाडाला भरावे लागणार आहेत. एका वर्षासाठी EWS घरांसाठी 2000, LIG घरांसाठी 3000, MIG घरांसाठी 4000 आणि HIG घरांसाठी 5000 रुपये भरावे लागणार आहे. ही सगळी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचे घर भाड्याने देऊ शकणार आहेत.
वाचा : आता केवळ आधार कार्डद्वारे खरेदी करा स्वप्नातले घर, जाणून घ्या कसे