वर्षभराचा रिचार्ज मोफत ! Jio नं आणली ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर, करा फक्त ‘हे’ काम

अलिकडेच खाजगी दूरसंचार कंपन्या Jio, Airtel आणि Vi ने आपले सर्व मोबाईल रिचार्ज प्लॅन महाग केले होते. त्यामुळे जिओचा एक वर्षाचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 3599 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, आता काही भाग्यवान विजेत्यांना हा रिचार्ज मोफत मिळण्याची संधी मिळणार आहे. एका अहवालानुसार, कंपनी Jio AirFiber कनेक्शनसह 3599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन विनामूल्य देत आहे.

मीडिया अहवालांनुसार, जिओने या ऑफरची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. फक्त हे स्पष्ट करण्यात आले आहे की, 50 रुपयांचे पेमेंट करून नवीन एअरफायबर कनेक्शन बुक करणाऱ्या वापरकर्त्यांना 3599 रुपयांचा वार्षिक प्लॅन जिंकण्याची संधी आहे. म्हणजे, जिओ एअरफायबर कनेक्शन घेणाऱ्या प्रत्येक नव्या ग्राहकाला हा फ्री रिचार्ज मिळणार नाही, तर केवळ काही नशीबवान ग्राहकांना ही मोफत सुविधा मिळेल.

वर्षभराचा 3599 रुपयांचा रिचार्ज

जिओचा 3599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा एक वार्षिक प्लॅन आहे, ज्यामुळे यात एक वर्षाची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि रोज 2.5 जीबी डेटा मोफत मिळतो. याशिवाय, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडची सुविधाही दिली जाते. तसेच, वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा मिळतो. थोडक्यात, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा वापरण्याची सुविधा आहे, आणि जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा यामुळे मनोरंजनाची कमतरता भासणार नाही.

जिओ एअरफायबर

जिओ एअरफायबर ही कंपनीची एक नवीन सेवा आहे ज्यामध्ये फिक्स्ड-वायरलेस अ‍ॅक्सेस 5G सेवा पुरवली जाते. जिथे जिओ फायबर इंटरनेट पोहचत नाही, तिथे ही सेवा दिली जाते. या नवीन कनेक्शनच्या खरेदीवर कंपनी 3599 रुपयांचा रिचार्ज जिंकण्याची संधी देत आहे. अहवालानुसार, फक्त 50 रुपयांमध्ये जिओ एअरफायबर कनेक्शन बुक करता येते. विशेष म्हणजे, ही बुकिंग रक्कम परत करण्यायोग्य आहे, आणि कनेक्शन न घेतल्यास कंपनी पैसे परत देते. आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने ही नवीन ऑफर सादर केली आहे.

Leave a Comment