Credit Card New Rule : 1 सप्टेंबरपासून एचडीएफसी बँक युटिलिटी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्सच्या संख्येला सीमा लावणार आहे. यापुढे, ग्राहकांना दरमहा फक्त दोन हजार पॉइंट्स मिळू शकतील. खर्चाच्या विशिष्ट श्रेणींमध्ये रिवॉर्ड्सचे संकलन नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
टेलिकॉम आणि केबल व्यवहारांवर मर्यादा: 1 सप्टेंबरपासून टेलिकॉम आणि केबल व्यवहारांवर दरमहा दोन हजार पॉइंट्सची सीमा राहील. हे व्यवहार विशिष्ट व्यापारी श्रेणी कोड (एसीसी) अंतर्गत नोंदवले जातील. या मर्यादेमुळे क्रेडिट कार्डचा योग्य वापर सुनिश्चित होईल.
तृतीय पक्ष शिक्षण पेमेंट्सवर रिवॉर्ड बंद: तृतीय पक्ष अॅप्सच्या माध्यमातून केलेल्या शैक्षणिक पेमेंट्सवर एचडीएफसी बँक रिवॉर्ड पॉइंट्स देणार नाही. 1 सप्टेंबरपासून लागू होणारा हा बदल अधिकृत चॅनेलद्वारे थेट पेमेंट्सला प्रोत्साहन देतो. रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी पेमेंट्स शैक्षणिक संस्थेच्या वेबसाइट किंवा पीओएस मशीनद्वारेच करावीत.
आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्डमध्ये सुधारणा: सप्टेंबर 2024 पासून आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्डवर देय असलेली किमान रक्कम कमी करणार आहे, तसेच पेमेंटची अंतिम तारीख 18 दिवसांवरून 15 दिवसांपर्यंत कमी होईल. हे बदल ग्राहकांना आर्थिक शिस्त लावण्यासाठी केले जात आहेत.
यूपीआयवर रूपे क्रेडिट कार्ड: 1 सप्टेंबर 2024 पासून, यूपीआय आणि इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंट्ससाठी RuPay क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना इतर पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या क्रेडिट कार्डधारकांइतकेच रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. यात कोणताही फरक नसेल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) बँकांना रिवॉर्ड पॉइंट्स आणि RuPay क्रेडिट कार्डच्या फायद्यांमध्ये समानता राखण्याचे निर्देश दिले आहेत.
देशभरात क्रेडिट कार्ड वापर वाढत आहे. अनेक वेळा बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून मोफत कार्ड ऑफरबद्दल फोन येतात. त्यात काही खऱ्या माहिती देतात, तर काही एजंट ग्राहकांना संपूर्ण माहिती न देता कार्ड देण्याचा प्रयत्न करतात.
मार्केटमध्ये क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या सर्व सवलती आणि रिवॉर्ड पॉइंट्सबद्दल सांगितलं जातं; पण कार्ड मिळाल्यानंतर कोणते चार्जेस आकारले जातील, याची माहिती सहसा दिली जात नाही. क्रेडिट कार्ड कंपन्या किंवा बँका वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे घेतात. त्यामुळे ग्राहक म्हणून तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती असणं अत्यावश्यक आहे.