म्हाडाची घरे आता सुलभ हप्त्याने (EMI) नुसार मिळणार, पहा संपूर्ण माहिती

मुंबई : विरार-बोलीजमध्ये वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या चार हजारांहून अधिक घरांची विक्री करण्याचा नवा पर्याय म्हाडा आता अवलंबणार आहे. म्हाडाच्या कोकण विभागाची बोळींजमधील घरे सुलभ हप्त्यांमध्ये विकण्याची योजना आहे आणि 25 टक्के डाउन पेमेंट भरल्यानंतर खरेदीदाराला उर्वरित रक्कम सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय असेल. यासंदर्भातील प्रस्ताव कोकण मंडळाकडून लवकरच म्हाडा प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

सुरुवातीला कनेक्टिव्हिटी आणि पाण्याची पुरेशी उपलब्धता नसल्याने गेल्या पाच वर्षांत अनेक वेळा लॉटरी काढूनही बोळींजमधील घरांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत 2277 फ्लॅट्स विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या घरांसाठी मुंबईत रेल्वे, बस्थानाक येथे जाहिराती सुद्धा देण्यात आल्या. सूर्या प्रकल्पातून पाणी येऊनही घरांची विक्री वाढली नाही. त्यानंतर म्हाडाने नव्या धोरणानुसार ही घरे विकण्याचा निर्णय घेतला. 100 किंवा त्याहून अधिक घरे खरेदी करणाऱ्या संस्थांना 15 टक्के सवलत जाहीर करण्यात आली. त्याकडेही अर्जदारांनी पाठ फिरवली. नुकतीच म्हाडाच्या कोकण विभागाची बैठक झाली. या बैठकीत बोलिंगमधील घरे कशी विकायची यावर चर्चा झाली. सुलभ हप्त्यांवर घर विकण्याबाबत चर्चा झाली. म्हाडानेही 1980-85 दरम्यान हा पर्याय निवडला होता.

फक्त 25 टक्के पैसे भरून आणि उर्वरित रक्कम सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय असणार आहे. घराचा मासिक हप्ता भाड्यापेक्षा थोडा जास्त असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य कामगारांना भाड्याच्या घराऐवजी स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. सदर घराची अंतर्गत विक्री करायची असल्यास म्हाडाची एनओसी आवश्यक आहे.

म्हाडासाठी अडचण

विरार-बोलीजमध्ये अनेक वर्षांपासून घरे विकली गेली नसल्याने म्हाडासाठी ही डोकेदुखी ठरत आहे. या धूळ खात पडलेल्या घरांची देखभाल, कर, पाणी, लाईट बील, लिफ्टची देखभाल, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती यावर म्हाडाकडून लाखो रुपये खर्च केले जात आहेत. त्यामुळे ही घरे विकण्यासाठी म्हाडा नवनवीन पद्धती वापरत आहे.

वाचा : मुंबईत मागेल त्याला म्हाडाचे घरे..! म्हाडाचे प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घरांची विक्री?

1 thought on “म्हाडाची घरे आता सुलभ हप्त्याने (EMI) नुसार मिळणार, पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment