कुणाचं नशीब फळफळणार? म्हाडाच्या घरांची आज सोडत । Mhada Lottery 2024 Result

पुणे : नवीन घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर समोर आली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या अखतारित्यात पुणे शहर व परिसरात विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 4850 घरांनसाठी आज सोडत निघणार आहे. पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी ही सोडत निघणार आहे. ही सोडत आज सकाळी दहा वाजता सुरु होणार आहे.

कुठे होणार सोडत?

18 जुलै 2024 वेळ: सकाळी 10.00 वाजता स्थळ: जिल्हा परिषद सभागृह, पुणे जिल्हा परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, कॅम्प, पुणे – 01 या सोडतीसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ही सोडत काढली जाणार आहे.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लीक करा

नवीन संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत काढण्यात येत आहे. या पद्धतीत, अर्जदारांची नोंदणी आणि पात्रता निश्चित केल्यानंतर, अर्जदार प्रक्रियेत सहभागी होतो. विजेत्याची घोषणा झाल्यानंतर अर्जदाराला एक सूचना पत्र पाठवले जाईल. तरतुदींची पूर्तता केल्यानंतर, यशस्वी अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठवले जाईल.

लॉटरी विषयी पहा सविस्तर व्हिडिओ

3 thoughts on “कुणाचं नशीब फळफळणार? म्हाडाच्या घरांची आज सोडत । Mhada Lottery 2024 Result”

Leave a Comment