मुंबईत म्हाडाच्या लॉटरीसाठी मुहूर्त ठरला! 1900 घरांसाठीची सोडत ‘या’ दिवशी

Mumbai Mhada Lottery: मुंबईत किमान एक तरी हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मुंबईकरांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबईतील 1900 घरांसाठी जुलै महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होणार असून ऑगस्टमध्ये लॉटरी काढण्याची तयारी म्हाडाने केली आहे. लॉटरीची वाट पाहणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

मुंबईत हक्काचे घर घेणे मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. 1BHK घरांच्या किमती लाखो-करोडोंच्या घरात गेल्या आहेत. मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी घर घेणे प्रत्येकाला परवडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना म्हाडाच्या लॉटरीची प्रतीक्षा आहे. म्हाडा मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये घरे पुरवते. परवडणारी आणि मोक्याची असणारी घरे सर्वसामान्यांना परवडणारी आहेत. ऑगस्ट 2023 मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील सुमारे चार हजार घरांसाठी लॉटरी काढली. यासाठी सुमारे पाच लाख अर्ज आले होते.

ऑगस्ट 2023 मध्ये म्हाडाने गोरेगाव, विक्रोळी येथील घरांसाठी लॉटरी काढली. यानंतर म्हाडाची यंदाची लॉटरी कधी निघेल याची सर्वांना प्रतीक्षा होती. मात्र, आता ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे. म्हाडाच्या मुंबई विभागाने सुमारे 1900 घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे. ही घरे मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व उत्पन्न गटांसाठी असतील. जुलैमध्ये या घरांसाठी लॉटरीची जाहिरात काढण्यात येणार आहे. ऑगस्टमध्ये लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या घरांचे ठिकाण अद्याप समजू शकलेले नाही.

मोठ्या घरांचा समावेश

गोरेगाव प्रेमनगरमध्ये 322 हायफाय घरे बांधण्यात आली आहेत. ही घरे 800 आणि 1000 चौरस फुटांचे फ्लॅट बांधलेले आहेत. ऑगस्टमध्ये होणाऱ्या सोडतीत म्हाडाही या घरांचा समावेश करणार आहे. मात्र या घरांच्या किमती अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

तुम्ही अजूनही म्हाडाचे रजिस्ट्रेशन केले नसेल तर आताच करून घ्या. कारण लॉटरी जाहीर झाल्यांनंतर फॉर्म भरताना आधी म्हाडाचे रजिस्ट्रेशन करावे लागते त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतो. तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही वरील नंबरवर कॉल करून सेवा शुल्क देऊन फॉर्म भरू शकतात.

वाचा : मुंबईत भाड्याच्या घरासाठी 2 BHK’चा ट्रेंड..! जाणून घ्या एरिया नुसार घर भाडे

1 thought on “मुंबईत म्हाडाच्या लॉटरीसाठी मुहूर्त ठरला! 1900 घरांसाठीची सोडत ‘या’ दिवशी”

Leave a Comment