Mhada lottery 2024 : स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडकोने अनेक प्रकल्प आणले आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने पुणे विभागात परवडणाऱ्या घरांची लॉटरी काढली आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडा लवकरच 13 हजार घरांची लॉटरी काढणार आहे. त्यामुळे तुम्हाला मुंबई, पुणे, ठाण्यात म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
पहिल्यांदाच म्हाडाचा अर्ज करत असाल तर हे लक्षात ठेवा
म्हाडाचे अर्ज भरताना सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. काहीही एक चूक केली तर फार्म नाकारला जातो. अशा परिस्थितीत म्हाडात घर घेण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला म्हाडाचा अर्ज पहिल्यांदा भरण्यासाठी काय करावे आणि काय लक्षात ठेवावे हे सांगणार आहोत.
अर्ज कसा करायचा?
housing mhada gov in ही म्हाडाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. या नोंदणीसाठी आधार आणि पॅन कार्ड आवश्यक आहे. या नोंदणी दरम्यान तुम्हाला इतर माहिती देखील द्यावी लागेल. या सगळ्यानंतर तुम्ही म्हाडात अर्ज करण्यास पात्र ठरता.
म्हाडाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा
फॉर्म भरतांना महत्त्वाची गोष्ट
म्हाडात अर्ज करताना तुम्ही कोणत्या कोट्यातून आणि गटातून फॉर्म भरणार आहात हे आधी ठरवा. कारण सर्वांना न्याय मिळावा म्हणून म्हाडात विभागवारी करण्यात आले आहे. पत्रकार कोटा, डॉक्टर, स्वातंत्र्यसैनिक इत्यादी अनेक विभाग आहेत. मग तुमच्या पगाराच्या उत्पन्नानुसार त्या गटात अर्ज करा.
म्हाडाचा अर्ज लागणारी कागदपत्रे
पॅन कार्ड
आधार कार्ड
कॅन्सल चेक
अधिवास प्रमाणपत्र
वाहन चालविण्याचा परवाना
पासपोर्ट फोटो
जन्म प्रमाणपत्र
अर्जदाराच्या संपर्काचे तपशील
म्हाडाचे घर घेण्यासाठी कोण करु शकतो अर्ज
18 वर्षांवरील कोणताही नागरिक म्हाडासाठी अर्ज करू शकतो. शिवाय, त्यांनी महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य केले असावे. म्हाडाचे अर्ज करताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 02226598924/9834637538 वर कॉल करू शकता. याशिवाय 18004250018 या क्रमांकावरही संपर्क साधू शकता.
लॉटरीत तुमचे नाव दिसल्यास तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागतील. आधी कागदपत्रे नसल्यास म्हाडा तुम्हाला वेळ द्यायचा. परंतु नवीन नियमांनुसार, तुम्हाला दिलेल्या तारखेला सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.
फॉर्म भरतांना या चुका टाळा
तुमचे नाव, पत्ता आणि कामाची माहिती अचूकपणे द्या. कागदपत्रे तपासताना काही तफावत आढळल्यास तुमचा फॉर्म रद्द केला जाईल. नोंदणी आणि पेमेंट पावत्या दोन्ही डाउनलोड करा आणि जपून ठेवा. या पावत्या हरवल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. म्हाडाची फाईल करतांना नेहमी चार फाईल तयार करा. एक बँकेसाठी, दुसरी म्हाडा कार्यालयासाठी आणि दोन तुमच्यासाठी… कारण म्हाडातील फायली गहाळ होण्याची अनेक प्रकरणे झाली आहेत.
तुम्हाला म्हाडाचे घर न मिळाल्यास, अर्जदाराने भरलेली रक्कम सात दिवसांत परत केली जाते. तुम्ही म्हाडाच्या वेबसाइटवर तुमच्या प्रोफाइलमध्ये लॉग इन करून ते तपासू शकता.
वाचा : ‘म्हाडा’ची किती घरे घेता येतात? लॉटरी शिवाय घरे मिळतात का?
2 thoughts on “Mhada lottery 2024 : स्वस्तात घर घेण्यासाठी भरा म्हाडाचा अर्ज, कसा तो आम्ही तुम्हाला सांगतो”