मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज गृहप्रकल्पातील विक्री वाचून रिक्त असलेल्या घरांची विक्री वित्तीय संस्थेच्या माध्यमातून करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. तर एकगठ्ठा 100 घरांची विक्री करण्यासाठी इच्छुकांकडून, संस्थांकडून स्वारस्य निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र या निविदेला प्रतिसादच मिळाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता या दोन्ही निविदा रद्द करण्याचा कोकण मंडळ विचार करत असून लवकरच यासंबंधीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
विरार-बोळींजमध्ये कोकण मंडळाचा 9000 हून अधिक घरांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील 5194 घरे विक्रीवाचून रिक्त असून यामुळे कोकण मंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होते आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने
घरे विकली जात नसल्याचे सांगितले जात होते, पण आता सूर्या प्रकल्पाचे पाणी आल्यानंतरही विरार- बोळींजच्या घरांची विक्री होताना दिसत नाही. ही घरे विकली जावीत यासाठी मंडळाने केवळ आधार कार्ड आणि पॅनकार्ड दाखवित घर खरेदी करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घरांची विक्री करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र तरीही घरे विकली जात नसल्याचे चित्र आहे.
कारण 5194 पैकी आतापर्यंत केवळ 672 घरे विकली गेली आहेत. अजूनही 4522 घरांची विक्री होणे शिल्लक आहे. अशात एकगठ्ठा 100 घरांच्या खरेदी किंमतीत 15 टक्के सवलत देत विकण्याचा तसेच वित्तीय संस्थेची नियुक्ती करत त्यांच्या माध्यमातून घरे विकण्याचा पर्याय कोकण मंडळाने स्वीकारला होता. त्यानुसार मार्चमध्ये निविदा प्रसिद्ध केल्या होत्या, मात्र त्यांना शून्य प्रतिसाद मिळाला.
या दोन पर्यायाद्वारे मोठ्या संख्येने घरे विकली जातील, असा विश्वास कोकण मंडळाला होता. मात्र या पर्यायांच्या निविदेला प्रतिसादच न मिळाल्याने कोकण मंडळाच्या आशा आता मावळल्या आहेत. या निविदा रद्द कराव्यात का असा विचार सुरू असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रिक्त घरांच्या विक्री धोरणातील इतर कोणत्या पर्यायाद्वारे घरे विकली जाऊ शकतात का याची चाचपणी सध्या सुरु असल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या घरांच्या विक्रीसाठी मंडळाला अ अजूनही कसरत करावी लागत आहे.
आर्थिक नुकसान
विरार-बोळींजमध्ये प्रकल्पातील 5194 घरे विक्रीवाचून रिक्त असून यामुळे कोकण मंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होते आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने घरे विकली जात नसल्याचे सांगितले जात होते, पण आता सूर्या प्रकल्पाचे पाणी आल्यानंतरही विरार-बोळींजच्या घरांची विक्री होताना दिसत नाही.
वाचा : द्रोणागिरी, तळोजा नोडमधील घरांच्या सोडतीची तारीख जाहीर? अर्जदार संभ्रमात | 2 bhk flat Mumbai