Housing Mhada : बीडीडी चाळ पुनर्विकासातील ज्या दुकानदारांना दुकानांऐवजी घरे हवी आहेत त्यांनाही इतर भाडेकरूंप्रमाणे ५०० फुटांची घरे दिली जातील, अशी हमी म्हाडाने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. अशा परिस्थितीत दुकानांऐवजी घरांची मागणी करणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हाडाचे वकील मिलिंद सत्ये आणि प्रकाश लाड यांनी बुधवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खथा यांच्या खंडपीठासमोर हे आश्वासन दिले. ज्या दुकानदारांना पुनर्विकासात घर हवे आहे त्यांनी म्हाडाकडे अर्ज करावेत. त्यांना घरे दिली जातील, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे.
बाकीच्या रहिवाशांप्रमाणे आम्हालाही ५०० चौ. फुटांचंच दुकान mhada shop हवं. बीडीडी चाळ शॉपकीपर्स असोसिएशनने फूटपाथ दुकाने देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. असं अंतुरकर यांनी संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयात सांगितले. त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ७ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
म्हाडा म्हणजे काय ? संपूर्ण माहितीसाठी येथे क्लीक करा
नक्की काय आहे प्रकरण :
नायगाव येथील बीडीडी चाळी, वरळी, ना.म. जोशी मार्ग आणि शिवडीमध्ये एकूण 16 हजार घरे आहेत. यापैकी 300 हून अधिक दुकानांना परवाना देण्यात आला आहे. परंतु आमची जागा निवासी खोलीसारखी 160 चौरस फुटांची आहे. मात्र, पुनर्विकासादरम्यान आमच्याशी गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत दुकानदारांच्या या संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
घर 500 चौरस फुटांचे, दुकान 160 फुटांचे का? Housing Mhada
पुनर्विकासात 160 चौरस फुटांच्या घराऐवजी 500 चौरस फुटांचे घर दिले जाणार आहे. परंतु आमच्याकडे 160 चौ. फूट गाळ दुकानासाठी उपलब्ध असेल. हे चुकीचे आहे, बीडीडीमध्ये 500 चौरस मीटर जमीन पुनर्विकासात पोलिसांना मिळणार आहे.शासकीय भाडेकरू नसतानाही झोपडपट्टीवासीयांना 300 फुटांची घरे मिळत आहेत. तर आमच्याकडे 500 चौरस फुटांचं आहे. दुकान पुनर्विकास करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
बीडीडी चाळींचा इतिहास ( History Of BDD Chawl)
1920 ते 1924 या काळात औद्योगिकीकरणामुळे घरांची कमतरता प्रामुख्याने शहरी भागात जाणवत होती. त्यामुळे बॉम्बे प्रांतीय राज्याचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज लॉईड यांनी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट किंवा बीडीडीची स्थापना करून मुंबई शहरात घरबांधणीची योजना तयार केली. घर किंवा फ्लॅट घ्यायचा विचार करताय तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर संकटे पाठ सोडणार नाही I Astro Vastu
म्हाडाच्या घरांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा
या योजनेअंतर्गत वरळी, जोशी मार्ग परळ, नायगाव आणि शिवडी येथे अंदाजे ९२ एकर जागेवर BDD चाळी बांधण्यात आली. या चाळींमध्ये प्रामुख्याने औद्योगिक कामगार आणि गिरणी कामगार राहत होते. 100 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बीडीडी चाळीमध्ये लेखक, राजकीय नेते आणि कलाकार अशा अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचे घर होते. याव्यतिरिक्त, मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचाही मोठा वाटा आहे.