astro vastu : प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते आणि ते पूर्ण करण्यासाठी तो आपले संपूर्ण आयुष्य गुंतवतो. जेव्हा आपण घर घेण्याचा विचार करतो तेव्हा घराची दिशा कोणती आहे आणि मुख्य दरवाजा कोणत्या दिशेने उघडतो हे आपण पाहतो. तसेच पूर्वाभिमुख घर सर्वात शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे घराशी संबंधित इतरही काही महत्त्वाचे नियम आहेत, जे तुम्ही नवीन घर घेताना पाळले पाहिजेत. जाणून घेऊया काय आहेत नियम..
घरी घेण्याआधी तेथे पुरेसा सूर्यप्रकाश आहे की नाही हे तपासा. घर खरेदी करताना सूर्यप्रकाश घरात यावा हे लक्षात ठेवा. घरात सूर्यप्रकाश नसल्यामुळे लोक आजारी पडू लागतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा राहते.
घराचा मुख्य दरवाजा पूर्व-ईशान्य किंवा उत्तर ईशान्य किंवा दक्षिण आग्नेय किंवा पश्चिम वायव्य असा वास्तु नियमांनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी या दिशांना सर्वोत्तम मानले जाते.
घरासमोर कोणतेही उंच खांब किंवा उंच झाड नसावे. असे म्हणतात कि त्यामुळे घरातील लोकांची चांगली प्रगती होत नाही आणि लोक आजारी देखील पडतात, असे म्हणतात.
Astro Vastu
घर खरेदी करताना ज्या भूखंडावर घर बांधले जात आहे तो आयताकृती आहे की चौकोनी आहे हे पाहणे आवश्यक आहे. वास्तूनुसार जागा आडवी किंवा तिरकस नसावी. चुकूनही असा प्लॉट खरेदी करू नका.
घराच्या मधोमध बाथरूम असेल असे घर निवडू नका. घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला स्नानगृह बांधणे उत्तम मानले जाते.
घर खरेदी करताना घराच्या स्वयंपाकघराची दिशाही तपासा. आग्नेय कोन स्वयंपाकघरासाठी सर्वोत्तम मानला जातो. जे आग्नेय दिशेला आहे. असे म्हटले जाते की घराचे स्वयंपाकघर या दिशेला ठेवल्याने महिलांचे आरोग्य चांगले राहते आणि देवी लक्ष्मी घरात नेहमी वास करते.
घर खरेदी करण्यापूर्वी बेडरूमची दिशा नक्की पहा. वास्तूनुसार मुख्य खोली दक्षिण-पश्चिम दिशेला आणि मुलांची खोली उत्तर-पश्चिम दिशेला असावी.
घर खरेदी करताना लक्षात ठेवा की घराचा मध्यभाग रिकामा असावा. म्हणजे घराच्या मध्यभागी जागा किंवा इतर कोणताही अडथळा नसावा.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारित आहे)