मुंबई : वरळी BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या पुनर्वसन इमारतींमध्ये पात्र चाळकऱयांना वितरित करण्यासाठी म्हाडाने अलीकडेच 842 पुनर्वसन सदनिका निश्चिती केल्या आहेत. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या लोकांचे फ्लॅट्स निश्चित करण्यात आले असून, डिसेंबर 2025 पर्यंत फ्लॅट्स ताब्यात देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. इमारत क्रमांक 1 मधील बी, एफ आणि एच विंगमध्ये या चाळकऱयांची सदनिका निश्चिती करण्यात आल्या आहेत.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा नागरी पुनर्निर्माण प्रकल्प असून या प्रकल्पाचे काम महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाले. म्हाडाच्या माध्यमातून वरळीच्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम सध्या जोरात सुरू आहे. TCC कन्स्ट्रक्शन कंपनी वरळीमध्ये 121 चाळींचा पुनर्विकास आणि 9689 फ्लॅट बांधणार आहे. या अंतर्गत वरळी BDD मधील 18, 19, 20, 59, 60, 61, 78, 79, 80, 81 आणि 82 अशा अकरा चाळींमध्ये राहणारे 842 पात्र चाळकऱयांचे फ्लॅट्स म्हाडाने निश्चिती केले आहेत.
मुंबईतील घरांसाठी इथे क्लीक करून भरा ऑनलाईन फॉर्म
सदनिकांची खातरजमा केल्यानंतर आता या चाळकऱयांसोबत करार केला जाणार आहे. त्यानंतर चाळकऱयांसोबत भाडे किंवा संक्रमण शिबिराचा पर्याय देऊन अकरा चाळी रिकाम्या केल्या जातील. चाळ 18, 19, 20 च्या जागेवर व्यावसायिक इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येणार असून इतर आठ चाळींच्या जागेवर पुनर्वसन इमारत सुरू करण्यात येणार असल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
वाचा : मुंबईत कलीना येथे म्हाडाचे फ्लॅट विक्रीस..! या लोकांना करता येणार अर्ज