Cidco Lottery 2024 : हक्काचे घर शोधणाऱ्यांसाठी सिडको, म्हाडा यांसारख्या संस्था मोठी मदत करत असतात. रिअल इस्टेट प्रकल्पांतर्गत मुंबई महाननगरात घरांच्या किमती गगनाला भिडत असताना, या संस्था वाजवी दरात घरे देत आहेत. आता या सिडकोने नवी मुंबई परिसरात नवीन योजना सुरू केली आहे.
सिडकोने नवी मुंबई मध्ये अनेक नोड विकसित केले आहेत, आता सुमारे 30 ते 40 वर्षांनंतर या नोडमधील अनेक गृहप्रकल्प आणि बांधकामे जीर्ण झाली आहेत. या गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून डोके वर काढत होता. त्यानंतर अखेर या इमारतींच्या पुनर्विकासाची वेळ आली आहे.
सिडकोच्या या पहिल्या पुनर्विकास योजनेअंतर्गत तीन मजली इमारतींच्या जागी 14 मजली प्रशस्त टॉवर बांधण्यात येणार आहेत. खांदा कॉलनीत हा प्रकल्प 3 वर्षात बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. खांदा कॉलनी येथील पीएल 6 प्रकारच्या सह्याद्री सोसायटीचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. या प्रकल्पाचे बांधकाम लवकर पूर्ण होणार आहे
यात नवी मुंबई मध्ये नवीन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी या परिसरात सिडको नोडमधील अनेक प्रकल्प सध्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या सगळ्यांचा पुनर्विकास झाला तर प्रत्येक मध्यमवर्गीयांना कमी किमतीत घरे मिळणे शक्य होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे महामार्गालगत असलेल्या खांदा कॉलनीतील गृहप्रकल्पाला येत्या काही दिवसांत नवे रूप मिळणार आहे. हा प्रकल्प राज ग्रुपच्या तुलसी होममेकर कंपनीद्वारे विकसित केला जाणार आहे. हे 192 जुन्या घरमालकांना वाढीव चटईक्षेत्रासह प्रशस्त घरे प्रदान करेल. याशिवाय 460 नवीन घरेही बांधली जाणार आहेत. याशिवाय 49 व्यावसायिक गाळ्यांचाही येथे समावेश करण्यात येणार आहे.
हे प्रकल्प पूर्ण झाल्या नंतर लॉटरी पद्धतीने या घरांचे वाटप होणार आहे. हे प्रकल्प पुढील वर्षापर्यंत पूर्णत्वास येतील अशी शक्यता आहे. तो पर्यंत आपण पैशांची तजवीज करून ठेवणे फायद्याचे ठरणार आहे. या घरांसंधार्बत नवीन कुठलीही माहिती आल्यास आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवू तो वर तुम्ही आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या. लॉटरी संधर्बात नवीन माहिती आल्यास आम्ही व्हाट्सअँप ग्रुप माध्यामातून तुमच्यापर्यंत पोहचवत असतो.