म्हाडा लॉटरीचा धडाका..! ठाण्यात 10 हजार तर मुंबईत 3 हजार घरांची लॉटरी 1 bhk in Thane

Thane Mumbai 1 bhk flat : म्हाडाच्या मुंबई विभागाकडून लवकरच 2000 घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, कोकण विभागानेही लॉटरीची तयारी सुरू केली आहे. लॉटरीसाठी घरांची जुळवाजुळव सुरू असून लवकरच बैठक होणार आहे. कोकण मंडळात सुमारे नऊ हजार घरे असून, आणखी काही घरे वाढवता येतील, असे कोकण मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

गोरेगाव येथील घरासाठी येथे क्लीक करून अर्ज करा । Under Construction Projects - 1, 2, 3 & 4 BHK

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या मास्टर लिस्टमधील पात्र अर्जदारांना देकार पत्र देताना मुंबई बोर्डाकडून 2 हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता कोकण मंडळ गृहनिर्माण सोडतीकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी लॉटरी काढण्यासाठी मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये मुंबई विभाग, कोकण विभाग आणि पुणे विभागाचा समावेश आहे.

ठाण्यात 1 bhk घर घेण्यासाठी इथे क्लीक करा । buy 1 bhk house in Thane

3 हजारांहून अधिक घरे

मंडळाची तीन हजारांहून अधिक नवीन घरे आहेत. यामध्ये 20 टक्के योजनेंतर्गत सुमारे 900 घरे, प्रधानमंत्री आवास योजना आणि म्हाडा योजनेंतर्गत 1500 हून अधिक घरांचा समावेश आहे. यामध्ये आधीच्या लॉटरीत 4,000 हून अधिक न विकल्या गेलेल्या घरांचाही समावेश आहे. मुंबई मंडळामार्फत काही दिवसांत सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून, कोकण मंडळानेही विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेपूर्वी सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे.

अर्ज कसा करावा ? घर १०० टक्के लागणार कसे? पहा सविस्तर माहिती

3 thoughts on “म्हाडा लॉटरीचा धडाका..! ठाण्यात 10 हजार तर मुंबईत 3 हजार घरांची लॉटरी 1 bhk in Thane”

  1. मला माझ्या स्वप्नातल सवताहाच घर कमी किमतीत मिळाले तर मी म्हाडाचे आभार🙏💕 मानल

    Reply

Leave a Comment