Mhada lottery result : पुणे मंडळाने अर्जदारांची अंतिम प्रारूप यादी जाहीर केली आहे. पहिली प्रारूप यादी 18 जून रोजी जाहीर झाली होती. त्यानंतर 24 जून रोजी अंतिम प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. ही प्रारूप यादी तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटला जाऊन पाहू शकणार आहात. या म्हाडाच्या लॉटरीत एकूण उपलब्ध घरांची संख्या 4,877 होती. या घरांसाठी एकूण 47,490 अर्ज म्हाडाकडे प्राप्त झाले आहे. त्यात 668 अर्जदार अपात्र झाले आहे. म्हणून एकूण पात्र अर्जाची संख्या 46,667 आहे.
PMAY म्हंणजेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कात्रज येथील प्रकल्पासाठी एकूण 37 अर्ज आले आहे. या प्रकल्पात म्हाडाने 998 घरे उपलब्ध केली होती मात्र या घरांसाठी फक्त 37 अर्ज आल्याने हे सर्व अर्जदार घरांसाठी विजेते ठरणार आहे.
म्हाडा गृहनिर्माण योजने अंतर्गत शिरूर या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. यात घरांची संख्या 18 होती. योगायोग म्हणजे या घरांसाठी 18’च’ अर्ज प्रात्प झाल्याने सगळे अर्जदार विजेते ठरणार आहे.
या योजनेत घरांची संख्या अशी होती | Mhada lottery result
म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – 2416
म्हाडाच्या विविध योजना – 18
म्हाडा पंतप्रधान आवास (पीएमएवाय) योजना – 59
पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी) – 978
20 टक्के योजना पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड – 1406
एकूण 4877 सदनिका
1 thought on “लॉटरी पूर्वीच झाले म्हाडाचे विजेते..! पाहा विजेत्यांची नावे । Mhada lottery result”