म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर! म्हाडा काढणार 5 हजार 311 घरांची लॉटरी I mhada colony

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व प्रादेशिक विकास मंडळामार्फत mhada colony ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथे विविध गृहनिर्माण योजनांतर्गत बांधण्यात आलेल्या 5 हजार 311 घरांची लॉटरी डिसेंबर अखेर निघण्याची शक्यता आहे. सोडतीसाठी एकूण 30 हजार 687 अर्ज प्राप्त झाले असून ठेवीसह 24 हजार 303 अर्ज प्राप्त झालेले आहेत.

म्हाडाच्या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू झाली होती. अर्जदारांच्या सोयीसाठी शेवटची तारीख वाढवण्यात आली. प्राप्त अर्जांची प्रारूप यादीही आता प्रसिद्ध देखील करण्यात आली आहे. स्वीकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाईल.

अर्जदारांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे लॉटरीच्या नवीन तारखेची माहिती दिली जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज करणाऱ्या नागरिकांना PMAY योजनेंतर्गत नोंदणी करावी लागेल. यशस्वी अर्जदारांनी नोंदणी केली नसल्यास नोंदणी करणे आवश्यक आहे. कोकण मंडळाने प्रधानमंत्री आवास mhada colony योजनेंतर्गत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 13 डिसेंबर रोजी सोडत काढण्यात येणार होती. परंतु काही प्रशासकीय कारणास्तव ही सोडत आता पुढे ढकलण्यात आली आहे.

हेही वाचा : म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाच्या 1 लाख घरांसाठी निघणार महा लॉटरी; Mhada Lottery Mumbai

Leave a Comment