पवई, गोरेगाव, विक्रोळी येथील म्हाडाच्या घरांची होणार विक्री..! या दिवशी करता येणार अर्ज

मुंबई : म्हाडाच्या घरांची सोडतपूर्व प्रक्रिया सुरू करण्याचा मुंबई मंडळाचा प्रयत्न असून मुंबई मंडळाने आता लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी केली आहे. महिनाभरात जाहिरात प्रसिद्ध करून ऑगस्टपासून अर्ज विक्री व स्वीकृतीला सुरुवात करण्याची मंडळाची योजना आहे. सोडतीमध्ये सुमारे दोन हजार घरांचा समावेश असून मुंबई शहरातील उर्वरित घरांसाठी गोरेगाव, दिंडोशी, मालाड, कोपरी (पवई), कन्नमवार नगर (विक्रोळी) आदी ठिकाणी घरे काढण्यात येणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, 2023 ची सोडत अत्यल्प आणि अल्प गटासाठी होती. मात्र आता आगामी सोडत सगळ्या गटांसाठी असणार आहे. यावेळी अत्यल्प वर्गासाठी घरांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. कोपरी, पवई येथील 426 बांधकामाधीन घरे उच्च आणि मध्यम श्रेणीतील आणि पहाडी गोरेगावमधील पंचतारांकित प्रकल्पांमधील 332 (मध्यम आणि उच्च) घरे देखील सोडतीमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे यंदा या गटातील उमेदवारांना स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.

म्हाडाच्या मुंबई विभागात घरांना सर्वाधिक मागणी आहे. 2020 ते 2022 दरम्यान मुंबईत एकही सोडत काढण्यात आली नव्हती. 2019 नंतर 2023 मध्ये 4082 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. यंदाही लॉटरी काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार घरांचा शोध पूर्ण करून त्यांच्या किमती निश्चित करण्याच्या कामाला मंडळाने गती दिली आहे. दर निश्चित करून जाहिरात प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात पूर्ण होईल.

ऑगस्टमध्ये अर्ज विक्री-नोंदणी सुरू करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, मंडळाच्या प्रस्तावानुसार 2024 मध्ये सुमारे दोन हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. याला मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दुजोरा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोडतीमध्ये अल्प, मध्यम आणि उच्च गटासाठीची अधिक घरे असतील, तर अल्प उत्पन्न गटासाठी कमी घरे उपलब्ध असतील.

ऑगस्ट 2023 च्या सोडतीमध्ये अंदाजे 500 घरे शिल्लक आहेत आणि ही घरे आगामी सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. उरलेल्या घरांसह नव्याने बांधलेल्या घरांची संख्या कमी असल्याने, लॉटरीत घरांची संख्या वाढवण्यासाठी मंडळाने कोपरी, पवई आणि गोरेगाव, पहाडी या उच्च व मध्यम गटातील बांधकामाधीन प्रकल्पांतील घरांचाही समावेश केला आहे.

स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगला पर्याय

पवई तलावाजवळ कोपरी येथे 426 घरांचा प्रकल्प आहे. यातील 333 घरे मध्यम गटातील तर 93 घरे उच्च गटातील आहेत. तर गोरेगाव पहाडीत 227 उच्च गटातील घरे आणि 105 मध्यम गटातील घरांसह एकूण 332 घरे आहेत. कोपरी येथील प्रकल्पाचे 85 टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबरमध्ये या घरांना भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. गोरेगावमधील 65 टक्क्यांहून अधिक घरांचे काम पूर्ण झाले असून या घरांना मार्च 2025 मध्ये भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या घरांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा म्हाडाने केला आहे.

कन्नमवार नगरमध्ये कोपरा आणि पहाडीतील घरे अल्प आणि मध्यमवर्गीय गटांतील घरे आहेत. 2023 मध्ये, गोरेगावमधील PMAY ची उर्वरित 88 घरे देखील सोडतीमध्ये समाविष्ट केली जातील. याशिवाय दिंडोशी, मालाड आणि तारदेव येथील उर्वरित साडेसात कोटी किंमत असणाऱ्या घरांचाही समावेश करण्यात येणार आहे.

वाचा : मुंबईत भाड्याच्या घरासाठी 2 BHK’चा ट्रेंड..! जाणून घ्या एरिया नुसार घर भाडे

 

1 thought on “पवई, गोरेगाव, विक्रोळी येथील म्हाडाच्या घरांची होणार विक्री..! या दिवशी करता येणार अर्ज”

Leave a Comment