Mhada Flat : म्हाडा कोकण विभागामधील बोळींज, विरार येथे असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील उर्वरित घरे ही विकली जात नसल्याने म्हाडाचा कोकण विभाग अधिक चिंतेत आहे. परंतु, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA ) सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पामधून वसई-विरारला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने मात्र आता बोळिंज प्रकल्पातील पाण्याची समस्या आता दूर होतांना दिसतंय. अशा परिस्थिती मध्ये घरांच्या विक्रीबाबत मंडळाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
मात्र या पार्श्वभूमीवर, बोळींज येथील २२७८ घरांपैकी शेवटचे घर Mhada Flat विकले जाईपर्यंत अर्ज-विक्री-मंजुरी आता सुरू राहणार आहे.कारण अनेकवेळा प्रस्ताव तयार करून आणि ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेत सहभागी होऊनही बोलिंज येथील सुमारे १० हजार गृहप्रकल्पांपैकी २ हजारांहून अधिक घरांची विक्री न झाल्याने कोकण मंडळाची चिंता वाढली होती.
अंतिम मुदत 4 डिसेंबरपर्यंत
13 डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या सोडतीत 2278 न विकलेल्या घरांचा समावेश करण्यात आला आहे. घरांसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत शुक्रवारी रात्री 11.59 वाजता संपली आणि यादरम्यान 2278 घरांसाठी Mhada Flat केवळ 454 अर्ज जमा रकमेसह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे केवळ 454 घरांचीच विक्री होण्याची हमी देण्यात आली आहे. बोर्डाने बोलिंजमधील घरांसाठी अर्ज आणि विक्रीची मुदत 2 डिसेंबरपर्यंत आणि RTGS, NEFT द्वारे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 4 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.
हेही वाचा : सिडकोकडून 30 हजार घरांची निर्मिती; पहा नवी मुंबईतील कोणत्या भागात किती दर आहेत? cidco lottery 2023
या पार्श्वभूमीवर आता घरांसाठी अर्ज आणि मंजुरी सुरू राहणार आहे. कोकण विभागप्रमुख मारोती मोरे म्हणाले की, ४ डिसेंबरनंतरही अर्ज विक्री-स्वीकृती सुरू राहणार आहे. बोळींज प्रकल्पातील पाण्याचा प्रश्न देखील आता सुटला आहे. माहिती मोरे यांनी सांगितले.
454 अर्जदारांना थेट विजेते घोषित केले जाणार .. Mhada Flat
बोलिंज येथील 2278 घरांसाठी Mhada Flat आतापर्यंत 454 उमेदवारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत.मात्र आता उर्वरित घरांसाठी अर्ज स्वीकारणे जातील. तर ४५४ अर्जदारांना सोडतीमध्ये समाविष्ट न करता थेट विजेते घोषित केले जाणार आहे. इमारती व घरांची संख्या निश्चित केल्यानंतर येत्या काही दिवसांत या विजेत्यांना तात्पुरत्या स्वरूपाचे डीड पत्र वाटप करून घरांचा ताबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.