पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये विविध उत्पन्न गटांसाठी ४७७७ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. मात्र, नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाने नागरिकांना घरांसाठी अर्ज करण्याची मुदत ३० मेपर्यंत वाढवली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटचे नऊ दिवस आता शिल्लक राहिले आहेत.
म्हाडाच्या पुणे मंडळाने मार्च महिन्यात लॉटरी जाहीर केली होती. या लॉटमधील घरांसाठी ८ मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीची अंतिम तारीख ८ एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती. मात्र, या कालावधीत केवळ १६ हजार अर्ज आले. त्यामुळे अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे रोजी रात्री ११:५९ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या १०० ने वाढली.
म्हाडा गृहनिर्माण लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी, अर्जदारांनी प्रथम http://www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in ला भेट द्यावी आणि यासाठी म्हाडा पुणे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.
सोडतीचा तपशील आणि फ्लॅटचे तपशील खालीलप्रमाणे आहेत
- म्हाडा योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य –२४१६
- म्हाडाच्या विविध योजना – 18
- म्हाडा प्रधानमंत्री आवास (PMAY) योजना –५९
- प्रधानमंत्री आवास (PMAY) खाजगी भागीदारी योजना (PPP) –९७८
- पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड १४०६ च्या २० टक्के योजना
- एकूण ४८७७ फ्लॅट्स
वाचा : पुण्यातील म्हाडाची 1BHK आणि 2BHK घरांची सविस्तर माहिती, किंमत 14 लाखांपासून