96 लाख महिलानांच्या खात्यावर या दिवशी 3000 रुपये जमा ladki bahin yojana latest news

महाराष्ट्र सरकारने गरजू महिलांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक विशेष योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे. या योजनेने महिलांच्या जीवनात नव्या आशेचा किरण आणला आहे.

महिलांच्या खात्यात जमा होणार आर्थिक मदत

या योजनेतर्गत, पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होणार आहेत. म्हणजेच वर्षभरात एकूण १८,००० रुपये त्यांना मिळणार आहेत. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा ३,००० रुपयांचा लाभ या महिलांच्या खात्यात आधीच जमा करण्यात आला आहे.

कोणाला मिळणार योजनेचा लाभ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना मिळणार आहे. वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असणाऱ्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी ही योजना आहे. महाराष्ट्रातील महिलांबरोबरच, ज्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला आहे, त्याही या योजनेच्या लाभार्थी ठरणार आहेत.

थेट लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया

या योजनेतील थेट लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, १६ लाख ३५ हजार महिलांच्या खात्यात ३,००० रुपये जमा झाले आहेत. यापूर्वी ८० लाख महिलांच्या खात्यात यशस्वीरित्या लाभ हस्तांतरित झाला आहे.

महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना

महाराष्ट्रातील ९६ लाख ३५ हजार महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित महिलांना लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभागाने युद्धपातळीवर कार्य सुरू केले आहे.

Leave a Comment